जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत दोन ट्रॅक्टर जमा केले आहेत. तर ६ हजार रुपये किमतीचा वाळूचा साठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा सुरूच आहे. सोमवारी रात्री १०:३० वाजता निमखेडी शिवारातील एका हॉटेलसमोरून ट्रॅक्टरमधून अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर जमा करून, चालक आकाश संतोष कोळी (वय २७, रा. दिनकरनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी कारवाई मंगळवारी सकाळी ६:३० वाजता खोटेनगर स्टॉपजवळ करण्यात आली आहे. याठिकाणीही ट्रॅक्टर जमा करण्यात…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथे मंगळवारी रात्री तीन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. तासाभरात दोन दुचाकी सापडल्या असून घटना माळी समाज मंगल कार्यालयाच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळी समाज मंगलकार्यालयात विवाह गर्दी होती. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. या दरम्यान पत्रकार मनोज जोशी यांची एमएच १९, एजे ०३४१ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. त्यानंतर ज्ञानेश्वर कुमावर यांची एमएच १७, ५६६८ क्रमांकाची तर समाधान भोंबे यांची विना क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. यातील कुमावत आणि भोंबे यांची दुचाकी नदी पात्रात आढळून आली. मात्र जोशी यांची दुचाकी मिळाली नाही. घटनास्थळी पोलिस कर्मचारी…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा येथील बसस्थानकावरून एका महिलेच्या हातातील बांगड्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच घटना दि.१९ डिसेंबर रोजी घडली याबाबत मंगळवारी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिलाबाई सूर्यवंशी (६६, मोराणे ता. जि. धुळे) यांनी याबाबत फिर्याव दिली आहे. दि. २० रोजी रोकडा फाम ता. भडगाव येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे त्या दि. १९ रोजी सकाळ ११ वाजेच्या सुमारास पती हंसराज निंबा सूर्यवंशी यांच्यासह मोराणे येथून बसने पारोळा येथे आल्या भडगावसाठी बसमध्ये चढत असतान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नाहाटा चौफुलीजवळ मंगळवारी पहाटे १:३० वाजता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले. या डंपर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे नव्हती. यामुळे एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे १.३० वाजता एलसीबीचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना नाहाटा चौफुलीजवळ विना क्रमांकाचा डंपर आला. पोलिस कर्मचारी संदीप पोळ यांनी डंपर थांबवत चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, गिरीश सानप (रा. जळगाव) याने कागदपत्रे सादर केली नाही. तो कुठलाही परवाना नसताना वाळूची अवैधपणे वाहतूक करत होता. तसेच डंपरवर क्रमांकदेखील नव्हता. यामुळे पोळ यांनी डंपर जप्त करून बाजारपेठ पोलिस ठाण्यात जमा केला. याबाबत पोळ यांच्या…
पाचोरा : प्रतिनिधी तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात काम करणाऱ्या तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नाचणखेडे येथे बुधवारी भल्या पहाटे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात नकला तयार करण्याचे काम करणारा तरुण आकाश रामसिंग पाटील (२९, नाचणखेडे) हा मंगळवारी रात्री जेवण करून झोपला. २५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यास पत्नी झोपेतून उठविण्यास गेली असता तो उठला नाही. त्यास तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यास मागील आठवड्यात डेंग्यूची लागण झाली होती, त्यातून तो सावरला होता. मात्र, आकाश याचा झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट करण्यात आले. एक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली, या घटनेत १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील या मुलाचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बन्हाटे (रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजस हा मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बन्हाटे यांच्या सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला जात होता. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मामा योगेश…
यावल : प्रतिनिधी तुमच्या मुलास एका गुन्ह्यात पकडले आहे, त्याला सोडवायचे असेल तर तत्काळ पैसे द्या… असे सांगत यावल येथील एका वृध्द दाम्पत्याची एक लाख तीस हजारात फसवणूक झाली. याबाबत यावल पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विस्तारित भागात राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले इसम आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा एरोली, मुंबई येथे नोकरीला आहे. बुधवारी त्यांना व्हॉट्सअपवर कॉल आला. संशयिताने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत ‘तुमच्या मुलाला गैरकृत्यप्रकरणी ताब्यात घेतले आहे, असे सांगत पैशांची मागणी केली. मुलाची भयभीत अवस्थेतील बनावट ऑडिओ क्लिपदेखील ऐकवली. मुलाच्या घाबरलेला आवाज ऐकून दाम्पत्याने लागलीच एक लाख ३० हजार रुपये संशयिताच्या खात्यावर पाठवले.…
मेष राशी आज लोकांना जोडण्यासाठी प्रयत्न वाढवाल. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय दृढ होईल. व्यावसायिक प्रयत्नात गांभीर्य राखाल. सामायिक कार्यात पुढाकार घ्याल. खटल्यातील विजयाने उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वृषभ राशी आज नोकरीत मेहनत वाढवावी लागेल. विरोधकांनी निष्काळजीपणाचा फायदा घेऊ नये याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बजेटची कमतरता जाणवेल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये जुनी स्थिती राहील. नोकरी व्यवसायात संयम ठेवा. मिथुन राशी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्याल व्यावसायिक सहकाऱ्याची भेट होईल. व्यवसायात लाभ होईल. उधार घेतलेली रक्कम परत मिळेल. एखाल दिलेले वचन पाळाल. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. कर्क राशी आज कौटुंबिक बाबतीत वरिष्ठांशी सुसंवाद…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल चालक, व्यवस्थापक व त्यांना मदत करणारा अशा तीन जणांना अटक केली. तसेच या हॉटेलमधून एका महिलेला व तेथून जवळच असलेल्या हॉटेल यश येथून एका महिलेला ताब्यात घेतले. अटक केलेल्या नीलेश राजेंद्र गुजर (२४, रा. रामेश्वर कॉलनी), चेतन वसंत माळी (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव), विजय सखाराम तायडे (३२, रा. खेडी, ता. जळगाव) या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना माहिती मिळाली होती. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी पोकॉ. गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातात घाबरून चिमुकला इतरत्र गेल्याने घटनास्थळावरून त्याच्या वडिलांना काही जणांनी रुग्णालयात नेल्याने दोघांची ताटातूट झाली. दुसरीकडे हा मुलगा रडत पप्पा-पप्पा करीत फिरत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता तेथे त्याचे वडीलही आढळले. यातून बालकाची ओळख पटली व त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा आर.एल. चौफुलीजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित प्रभाकर भालेराव (२५, रा. निमगूळ, ता. धुळे) हे मुलगा ऋषिकेश भालेराव (३ वर्षे) याच्यासह दुचाकीने जात असताना आर. एल. चौफुली जवळील एका हॉटेलनजीक त्यांची दुचाकी घसरली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे भयभीत…

