• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साधेपणा, प्रामाणिकपणा, महायुतीचे संघटन या बळावर मिळाला आ. राजूमामा भोळेंना मोठा विजय !

पुढील काळात प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आ. भोळेंचा मानस

editor desk by editor desk
November 28, 2024
in राजकारण, राज्य
0
साधेपणा, प्रामाणिकपणा, महायुतीचे संघटन या बळावर मिळाला आ. राजूमामा भोळेंना मोठा विजय !

जळगाव : प्रतिनिधी

येथील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. राजूमामा आता सुरेश दामू भोळे यांचा विजय हा महायुतीच्या संघटनाचा आणि जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाचा असल्याचे दिसून आले आहे. पुढील काळात पाठपुरावा करून प्रलंबित कामे पूर्ण केले जातील, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारासाठी कुठल्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. तसेच कुठलीही मोठी रॅली काढण्यात आली नाही. कुठल्याही सेलिब्रेटीचा रोड शो आयोजित झाला नाही. तरीही आ.राजूमामा भोळे यांनी केवळ दहा वर्षात केलेल्या विकास कामांना समोर ठेवून जनतेकडे मते मागितली. मी ५० टक्के कामे पूर्ण केली असून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. उर्वरित २५ टक्के कामे आगामी काळात मी पूर्ण करेल अशी भूमिका प्रामाणिकपणे आ. राजूमामा भोळे जनतेपुढे मांडत होते. आ. राजूमामांचा हाच स्वभाव जनतेला भावला.

आ. राजूमामा भोळे हे जनतेला त्यांच्या कार्यालयामध्ये सहज उपलब्ध होतात. जनतेची कामे ऐकण्यासाठी व ते पूर्ण करण्यासाठी आ. राजूमामा भोळे प्रत्यक्ष नागरिकांना माहिती देत असतात. संपूर्ण जळगाव शहरांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. मतदारसंघात १० वर्षात त्यांनी प्रचंड कामे केली आहेत. शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी स्वतः यंत्रणा राबवली. तसेच केंद्रीय व राज्याच्या विविध योजनांसाठी स्वतःच्या कार्यालयातील कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांच्या कामी येणारा व विधानसभेत शहराचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ. राजूमामा भोळे यांची ख्याती आहे.

आ.राजूमामा भोळे यांनी प्रचारामध्ये टीकाटिपणी तसेच आरोप करण्यापेक्षा सकारात्मक प्रचार कसा होईल यावर भर दिला. उड्डाणपूल, रस्त्यांचे कामे तसेच एमआयडीसी असे विविध मुद्दे जनतेला सांगून आशीर्वाद मागितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भावनिक आवाहन केले. विधानसभेत परिवर्तन हा मुद्दा जळगाव शहरात दिसूनच आला नाही. जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारे तसेच स्वच्छ प्रतिमेचे म्हणून आ. राजूमामा भोळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच आता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यानंतर आ. सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा यांच्या विजयाची परंपरा तिसऱ्यांदा देखील कायम राहिली आहे. तब्बल ८७ हजार ५०९ मताधिक्याने आमदार भोळे विजयी झाले आहेत.

Previous Post

भुजबळांचा निशाणा : … म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय !

Next Post

आज वैवाहिक जीवनात गोडवा राहणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

आज वैवाहिक जीवनात गोडवा राहणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group