मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे. संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 6 जणांवर आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे.…
Author: editor desk
अयोध्या : वृत्तसंस्था देशातील रामभक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेले अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा आज पहिला वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. राम मंदिरामुळे विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी रामलल्लाची महाआरती करणार आहेत. राम मंदिराला विदेशी फुलांनी सजवण्यात आले आहे. अयोध्येचे तापमान ४ अंश आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्ली, हिमाचलसह 10 राज्यातून लोक रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आज 2 लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेतील. मंदिर ट्रस्टने अंगद टिळा येथे जर्मन हँगर तंबू लावले आहेत. 5 हजार पाहुणे येतील, त्यापैकी 110 व्हीआयपी…
चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125 वी जयंती चंद्रपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, खरे तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पहायचो आणि ते नंतर मुख्यमंत्री देखील झाले. आता आम्ही तुमच्याकडे कर्तुत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिंमत आहे. त्यामुळे आता…
जळगाव : प्रतिनिधी सुप्रीम कॉलनी येथील माहेर असलेल्या रीना जयेश वंजारा (वय ३०) यांचा विवाह गुजरात राज्यातील पंचमहल येथील जयेश श्रावण वंजारा यांच्याशी झालेला आहे. दरम्यान पती जयेश याने विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच सासू, सासरे, दिर, नणंद आणि नंदोई यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती जयेश श्रावण वंजारा, सासू छबलाबाई श्रावण वंजारा, सासरे श्रावणे मथूर वंजारा, दीर कल्पेश श्रावणे वंजारा, नणंद सरोबाई उर्फ चोंगलीबाई बाबूलाल…
पाचोरा : प्रतिनिधी बनावट महिलेकडून प्लॉटची खरेदी खत नोंदणी गुन्ह्यातील आरोपींकडून पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी लॅपटॉप प्रिंटर हस्तगत केले आहे. याप्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या मनोज बन्सीलाल बेडवाल (३२) रा. जारगाव याला अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, संतोष भिला सोनवणे (३७, नांद्रा, ता. पाचोरा) याने पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिलेला उभे करून शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या मालकीच्या प्लॉटची विक्री केली होती. या प्रकरणी दुय्यम निबंधकांनी गन्हा दाखल केला होता यातील प्लॉटच्या मोबदला रकमेपैकी ५ लाख रुपये रोकड आरोपींकडून हस्तगत करण्यात आली. तसेच…
जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीवरील बांभोरी जवळील पुलावरून एका युवकाने शुक्रवारी रात्री ७.३० वाजता उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी युवकाने गिरणा नदीच्या पुलावरून आत्महत्या केली. पुलावरून जात असलेल्या काही वाहनधारकांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलिसांनी संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.
जळगाव : प्रतिनिधी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे यांना राँगसाईडने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वानखेडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी संशयित देवेंद्र योगेश भिलमाळ- बडगुजर (वय १९, रा.भोकर) याला अटक केली. तपासधिकारी मीरा देशमुख या संशयितांचा शोध घेत असताना पोलिस दलाच्या नेत्रम या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली. यामध्ये दुचाकीस्वार भरधाव असल्यामुळे धूसर दिसणाऱ्या दुचाकीचे फुटेज प्राप्त केले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासचक्रे फिरवीत त्यांनी धडक देणाऱ्या दुचाकीचा शोध घेतला. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५५, रा.…
जळगाव : प्रतिनिधी शिवाजीनगर भागातील एका सॉ मिल मालकाकडून ७७ हजार रुपये किमतीचा प्लायवूडच्या माल घेतला. मात्र, पैसे घ्यायला गेले असता पैसे द्यायला नकार देत, ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावेश पुरुषोत्तम पटेल (वय ३८) यांची शिवाजीनगर भागात सॉ मिल आहे. नोव्हेंबर महिन्यात रावेर तालुक्यातील विवरे येथील आसिफ भाई (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी ७७ हजार रुपये किमतीचा प्लायवूडचा माल घेतला. तसेच हा माल घेतल्यानंतर तत्काळ झालेली रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा ही रक्कम देण्यात आली नाही. त्यानंतर अनेक दिवस संबंधिताकडे सॉ…
मेष राशी आज तुम्ही सर्वांचे उत्साहाने स्वागत कराल आणि आदर राखाल. नफ्याची टक्केवारी वाढलेली राहील. जीवनशैली सुधारण्यात रस असेल. कौटुंबिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. लोकांशी संपर्क वाढवण्यात रस असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि सहवास मिळेल. वृषभ राशी सामायिक कामात नवीन करार होण्याची शक्यता आहे. गोड वागणुकीमुळे नफा वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. मनामध्ये आनंद आणि समाधान वाढेल. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. तुमच्या अडचणी आणखी वाढू देणार नाहीत. मिथुन राशी आर्थिक बाजू सुरळीत राहील. व्यावसायिकांना भेटाल. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकते. उद्योग सुरू करण्याच्या योजनेला गती…
नागपूर : वृत्तसंस्था देशातील भाजप सारख्याच पक्षात चहा विकणाऱ्या मुलगा हा एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कारण भाजप हा लोकशाहीने चालणारा जनतेचा पक्ष आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. आज महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी तर देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. सदस्यता मोहिम ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. भाजपला जगातील सर्वांत मोठा पक्ष बनवण्याचे अमित शहा यांचे टार्गेट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात 2300 हून अधिक पक्षांची नोंदणी आहे. यामध्ये बोटावर मोजण्या इतके पक्ष हे राष्ट्रीय आहेत. भाजपा आणि भाकप…

