आजचे राशिभविष्य दि. २१ एप्रिल २०२६ मेष राशी आज तुमची अडकलेली कामं नक्की पूर्ण होतील आणि तुम्हाला आराम वाटेल. आजचा दिवस या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभ असेल; तुम्ही लवकरच तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. हा दिवस विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत नातेवाईकांच्या घरी भेट देऊ शकता. कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळाल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशी आज तुमची अडकलेली कामं नक्की पूर्ण होतील आणि तुम्हाला आराम वाटेल. आजचा दिवस या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभ असेल; तुम्ही लवकरच तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. हा दिवस विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत नातेवाईकांच्या…
Author: editor desk
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून, आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील एका गावात सावत्र आई आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दोन मुले व दोन मुली असून दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. कौटुंबिक वादामुळे त्याची पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्या व्यक्तीने एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना कालांतराने या महिलेचे आपल्या सावत्र मुलाशी अनैतिक संबंध जुळल्याचे समोर…
अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुरीत गेल्या काही वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या २३ तारखेला होत असून वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर सुजात आंबेडकर यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत मतदारांना आवाहन केले. सुजात आंबेडकर म्हणाले की, “राहुरीत गेल्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली. या कारवाईत आरोपीकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, नशिराबाद बसस्टॅण्ड परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) हा सराईत आरोपी गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत फिरत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर नारखेडे यांनी आपल्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून सायंकाळी सुमारे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटकांकडून बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन इसम मोटारसायकलवरून विनापरवाना पिस्तूल घेऊन येत आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत उमर्टीहून येणारी…
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर महिलाविरोधी मानसिकतेचा आरोप केला. संसदेत या विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळू न दिल्याने विरोधकांनी देशातील सुमारे 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली. फडणवीस म्हणाले की, 17 एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात निर्णायक ठरेल अशी अपेक्षा होती. त्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, अशी सर्वसाधारण भावना होती. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांसह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला आवश्यक पाठिंबा न दिल्याचा आरोप त्यांनी केला. “विरोधकांनी केवळ विधेयक रोखले…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोर दुचाकीद्वारे यावलकडे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्रुझर वरील चालकाने भरधाव वेगात मागून धडक दिली. यामध्ये ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव (ता. यावल) येथून यावल येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोरून दि. ९ रोजी रात्री भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हा यावल येथील पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोटरसायकल (एमएच. १९ सीजी २८१३) द्वारे यावल येथुन किनगाव मार्गे विदगाव जात होता. दरम्यान भरधाव वेगात मागून कुझर चारचाकी वाहन (एम. एच. २९ बी.सी. ५४८७)…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीवरुन जात असलेल्या प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) या तरुणाला अडवित जून्या वादातून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बोरणार गावाजवळ घडली. यापक्ररणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेला गावातील अवैध धंद्याची किनार असून त्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरणार येथील प्रेम धनगर हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून घरी जात होता. गावापासून एक कि मी अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील व गजा कोळी यांनी त्याला अडविले. त्याला दुचाकीवरुन खाली उतरवून जून्या वादातून…
वरणगाव : प्रतिनिधी येथील भोईवाडा परिसरातील रहिवासी रितेश रवींद्र सोनवणे (३०) यांचा अक्षय तृतीयेच्या दिवशी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. लग्नास अवघे आठ दिवस शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश यांचा विवाह दि. २८ एप्रिल रोजी देवधाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील पांडुरंग बोरसे यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. घरात लग्नाची तयारी, खरेदी व आनंदाचे वातावरण सुरू असतानाच ही घटना घडली. अक्षय तृतीयेच्या पूजनाची तयारी सुरू असताना अचानक रितेश यांना झटका आल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. दोन दिवसांपूर्वीच मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. या घटनेमुळे वरणगाव शहरात…
वरणगाव : प्रतिनिधी शहरातील भवानी नगर परिसरात घरासमोर उभी केलेली चारचाकी गाडी हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप हरी चौधरी (रा. भवानी नगर) यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजेच्या सुमारास नाजीमअली गोबा याने चौधरी यांच्या घरासमोर चारचाकी उभी केली होती. पाणी भरण्यास अडचण होत असल्याने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत दिलीप चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, पत्नी सरला चौधरी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सुमारे…

