Author: editor desk

धाराशिव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे प्रेमसंबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमवून चुकवावी लागली. भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. रविवारी (दि.१६) त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, माऊली गिरीचे आणि पांढरेवाडी येथील विवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. ३ मार्च रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या  संभाषणामुळे हा प्रकार मुलीच्या पतीला कळला. संतापलेल्या पतीने माऊली याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. तेथे मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर ४-५ जणांनी त्याला विवस्त्र करून लोखंडी रॉड आणि…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघडू येथे अचानक रस्त्यावर आडवा आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार पुलावरून खाली कोसळली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात कारमधील पती-पत्नीसह त्यांचा दोन वर्षाचा बालक किरकोळ जखमी झाला. लखीचंद राठोड (३३), राणी राठोड (२६) व मुलगा दुर्गेश राठोड (२) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखीचंद राठोड हे कुटुंबासह गाडीने (एमएच१२/एक्सक्यू५९९८) मांडवा (ता. जामनेर) येथून धूलिवंदन साजरे करण्यासाठी सासरवाडी (वाघला कोंगानगर, ता. चाळीसगाव) येथे येत होते. नागद गावापासून काही अंतरावर असताना एक दुचाकीस्वार आडवा आला.  दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटून कार पुलावरून खाली कोसळली. कारचा आवाज आल्याने येथील मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली असता,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलाच्या अपहरणाच्या संशयावरुन तलवार घेत पाठलाग करीत तरुणाने एका प्रार्थनास्थळाबाहेरील माठ व इतर साहित्याची नासधूस केली. ही घटना रविवारी (१६ मार्च) वाल्मिक नगरात घडली. याप्रकरणी प्रवीण रमेश कोळी (३०, रा. वाल्मीक नगर, पिंजारी वाडा) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह अपहरण करणाऱ्या अज्ञाताविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाल्मिक नगर परिसरात अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना काही जणांनी त्याचे अपहरण केल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. त्या वेळी प्रवीण कोळी हा तलवार घेवून त्या इसमांच्या मागे गेला. अपहरण करणारे एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्याने हा तरुण त्या परिसरात पोहचला व बाहेर ठेवलेले…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या बाळू उर्फ गौरव धोंडू कोळी या ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या पाठीमागील शेत विहिरीत मृतदेह आढळला. हा तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चिंचोली गावातील बाळू हा दि. १२ मार्चपासून आपल्या घरातून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू होते. दरम्यान या तरुणाचा मृतदेह चिंचोली गावालगत असलेल्या महाविद्यालयाच्या मागील गोकुळ पाटील यांच्या शेत विहिरीत आढळून आला.

Read More

यावल : प्रतिनिधी अकलूद या गावात एका ६५ वर्षीय इसमाने दोन जणांकडून उसनवार पैसे घेतले होते. याचे व्याज मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून वृद्धाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर कडू पाटील (६५) या वृद्धाला विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे (रा. अकलूद, ता. यावल) या दोघांनी उसनवार पैसे दिले होते. विनोद श्रीराम इंगळे व गणेश भागवत काळे हे दिलेल्या पैशाचे व्याज प्रभाकर पाटील यांच्याकडून घेत होते आणि सातत्याने त्यांच्याकडे व्याजाचे पैसे मागण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. या त्रासाला…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही कठोर परिश्रमाच्‍या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्यावर कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुम्‍ही पुढाकार घ्‍याल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वृषभ राशी भूतकाळातील काही चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असू शकते. जवळच्या नातेवाईकांशी सुरू असलेला वाद सोडवता येतील. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय सुज्ञपणे घ्या. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. चुकीच्या कृतींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, असा सल्‍ला…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरण ताजे असताना आता आष्टी तालुक्यात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचा मालकाने खून केल्याचा आरोप विकासाचे नातेवाईक करत आहे. आरोपी बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास कामाला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला बांधून मारहाण केली जात होती. त्याच्या घराच्यांना फोन करुन ‘तुमच्या मुलाला घेऊन जा नाहीतर आम्ही मारून टाकू’, अशी धमकी दिली होती. धमकी मिळताच घराच्यांनी तात्काळ कडा आरोग्य केंद्र रुग्णालय गाठले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. मूळचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने 3 जणांचे नाव जाहीर केले आहे. आता 2 जागांसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. मागील 33 वर्षांपासून निष्ठेने काम केल्याने पक्षाने मोठी संधी दिली, असे संजय केनेकर यांनी म्हटले आहे. 20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे. दरम्यान देहूतील इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. तर, देहूतील शेत-शिवारात राहुट्या उभारून भाविक कीर्तन, प्रवचन ऐकण्यात तल्लीन झाले आहेत. टाळ-मृदंग आणि विठुनामाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तुकाराम बीज काय आहे? संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचे वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला…

Read More

यावल  : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. तिच्या सासऱ्यांकडूनतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी रोजी या पाच महिन्याच्या काळात वारंवार अत्याचार केला जात होता. दरम्यान, विवाहिता माहेरी गेली असता तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात…

Read More