Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी गुजरआळी भागातील रहिवासी आणि मणिपूरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेले जवान चेतन चौधरी (३४) यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७बीएन बीएसएफची तुकडी कार्यरत होती. याच तुकडीत जवान चेतन चौधरी कार्यरत होते. ११ मार्च रोजी सेवेवरून परत येत असताना इम्फाळ राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंगजवळ सैन्याचा ट्रक दरीत कोसळल्याने तीन जवान ठार झाले होते. याच अपघातात जवान चेतन चौधरी यांच्यासह काही जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांवर इम्फाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.  गेल्या चार…

Read More

चोपडा : प्रतिनिधी सुरतहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अडावद-यावल मार्गावर लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ शनिवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली (एमपी- ६८, पी-२७०) या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-ब-हाणपूर बसने अडावदनजीक लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ दुचाकीस्वाराला वाचविताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली. यावेळी लोणी पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी रुग्णवाहिका बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. जखमींवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका भारती सोनवणे, भिकूबाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एजंटच्या मध्यस्थीने एक लाख ६० हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले, मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली. यामध्ये वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह राहतो. त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता.जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी असून…

Read More

मेष राशी व्यवसाय आणि उपजीविकेच्या क्षेत्रात जास्त मेहनत केल्याने सुधारणा होईल. गुप्त शत्रूंच्या कारस्थानांपासून सावध राहा. विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. शैक्षणिक, आर्थिक आणि शेतीविषयक काम करणाऱ्या लोकांना फायदेशीर संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना लाभदायक संधी मिळतील. वृषभ राशी तुमची आर्थिक स्थिती थोडी नरम असेल. आज विविध कामांमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात योग्य लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे व्यवसायातील उत्पन्न खूपच कमी होईल. प्रेमप्रकरणात खूप पैसा खर्च होईल. पैशाच्या कमतरतेमुळे कुटुंबात अंतर्गत वाद होऊ शकतात. मिथुन राशी कोणाच्या तरी बोलण्यात अडकून व्यवसायात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. त्यामुळे पुढील व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. महत्त्वाची कामे तुम्हाला स्वतः करावी लागतील.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प जाहीर केला होता, आता सरकारविरोधात विरोधकांनी रान उठविले आहे तर आता महाराष्ट्र सरकार हे ढोंगी आणि दुतोंडी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर आतापर्यंत सरकारने तोंड उघडले नाही. हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलतोय. राजकीय प्रश्नांवर बोलतात, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतात, विरोधकांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर हे सरकार बोलायला तयार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बुलडाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याने आणि कृषी क्षेत्राचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्या शेतकऱ्याने अनेकदा मुख्यमंत्री आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मार्च 2025 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच नवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे 28 फेब्रुवारी 2025 अखेर रिक्त झालेल्या सदस्य, थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी बुधवार, 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध होईल. 19 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 26 मार्च 2025 रोजी प्रभाग निहाय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील लोकप्रतिनिधींच्या कथित गुन्हेगारी कारवायांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ज्या लोकांमुळे बीडची परिस्थिती गंभीर झाली आहे, ते त्यांच्याच तालमीत मोठे झालेत, असे त्या म्हणाल्यात. शरद पवारांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बीडमधील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम गत काही महिन्यांत दिसून येत असल्याचा दावा केला होता. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडमधील सर्वच नेते शरद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील रवंजा बु” येथील एका विद्यालयात दिनांक ११ मार्च रोजी या शाळेतील शिक्षक मंगेश पाटील याने इयत्ता ९वीतील एका विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.या संदर्भात एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली याची चाहूल लागल्याने संशयित आरोपी शिक्षक मंगेश पाटील हा ११मार्च पासुन फरार होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या सुचनेनुसार L.C.B चे लक्ष्मण पाटील (हवालदार), जितेंद्र पाटील (हवालदार) भुषण पाटील (पो.कॉ.)एरंडोल पोलिस स्टेशनचे महेंद्रसिगं पाटील (हवालदार)व राजेश…

Read More

सोलापूर  : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरावरून खालील बाजूला उभ्या असलेल्या अन् खाली उभे असलेले भाविक मंदिरावर असलेल्या भाविकावर दगड मारून धुळवड साजरी केली. दगडफेकीची चालत आलेली परंपरा मागील सुमारे ३०५ वर्षांपासून आजही तितक्याच मोठ्या उत्साहात साजरी करीत ग्रामस्थांकडून जोपासली. भोयरेचे ग्रामदैवत श्री जगदंबा देवी असून, हे मंदिर उंच टेकडीवर शेकडो वर्षांपूर्वी दगडात बांधण्यात आलेले आहे. मंदिरास ४० पायऱ्या आहेत. तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी, बिटले येथील देवी व भोयरे येथील जगदंबा देवी या सख्ख्या तीन बहिणी असल्याची आख्यायिका आहे. या देवीची यात्रा पौष महिन्यात भरते. शुक्रवारी धुळवडीदिवशी या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून गावातील मुख्य चौक असलेल्या साखरबाई…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’च्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केल्यानंतर त्याची बहिण चांगलीच आक्रमक झाली आहे. सतीश भोसले हा माझा भाऊ आहे. आतापर्यंत या प्रकरणात परिवार कधीच बोलला नाही. मात्र आता आमचे घर पाडण्यात आले. इतकेच नाही तर ते घर पेटवून देखील देण्यात आले. यावेळी आमच्या घरातील लहान मुलींना देखील मारहाण करण्यात आली. आता त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची बहिणीने केली आहे. त्यांनी समोर येत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता…

Read More