• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : बँकेचा मॅनेजरने १२२ कोटी घेऊन पसार !

editor desk by editor desk
February 15, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
बापरे : बँकेचा मॅनेजरने १२२ कोटी घेऊन पसार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. या बँकेत मोठा अपहार झाल्याची माहिती मिळत आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेची तिजोरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. NICB चा Former General Manager and Accounts head हितेश मेहता विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे तब्बल 122 कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

हितेश प्रवीणचंद मेहता असे आरोपीचे नाव आहे. हितेश बँकेच्या महाव्यवस्थापकपदी असताना दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यावेळी पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून 122 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं. बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात हितेश आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. पुढील तपासासाठी प्रकरण ईओडब्ल्यूकडे वर्ग करण्यात आलं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेविरोधात कारवाई केली. मुंबईस्थित या बँकेमध्ये जवळपास 1.3 लाख ठेवीदारांच्या ठेवी असून, साधारण 90 टक्क्यांहून अधिक खातेधारकांच्या खात्यांमध्ये 5 लाखांहून अधिक रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्यात आली होती. बँकेतील काही खात्यांची तपासणी केली असता अपेक्षित तपशील हाती न आल्यानं आरबीआयनं या बँकेवर कारवाई केली.

 

Previous Post

एकही आमदार निवडून येणार नाही : शिंदेंचा ठाकरेंना टोला !

Next Post

प्रिय व्यक्तीमुळे समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

प्रिय व्यक्तीमुळे समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group