Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा उत्साहात साजरा होत असतांना पिंपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंद्रायणी नदीत पोहून धुलवड साजरी करणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. धुलवडीनिमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेचारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात घडली. गौतम कांबळे (वय २४), राजदीप आचमे (वय २५) आणि आकाश विठ्ठल गोरडे (वय २४, सर्व रा. घरकुल, चिखली) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी…

Read More

मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अनोळखी व्यक्तीकडून विशेष सहकार्य आणि साहचर्य मिळेल. एखाद्या व्यावसायिक मित्राची भेट होऊ शकते. नोकरीत बढती, वाहन इत्यादी सुखसोयी वाढतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पदावरील व्यक्तीकडून मार्गदर्शन व आदर मिळेल. वृषभ राशी आज परीक्षेत वेळ जाईल. घरगुती खर्च जास्त राहील. कुटुंबात मोठा खर्च होऊ शकतो. जमा झालेले भांडवल खर्च होऊ शकते. विचार करूनच कृती करा. तुमच्या मुलांकडून काही आर्थिक मदत मिळाल्यास तुम्हाला दिलासा मिळेल. मिथुन राशी आज तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. सामाजिक कार्यात सहकार्य केल्याबद्दल तुमचा सन्मान होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता राहील. प्रेमविवाहाची योजना आखणाऱ्यांना कुटुंबातील सदस्यांकडून सकारात्मक संदेश…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे अर्थात दादा आणि भाई यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेससोबत या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मुख्यमंत्री करू असा विश्वास त्यांनी दिला आहे. अर्थातच होळी धुळवडीच्या निमित्ताने बुरा न मानो होली है…! अशीच ही त्यांची राजकीय धुळवड निमित्ताने माध्यमांशी बोलताना ही ऑफर असल्याने सत्तापक्षाने त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट पुढील दहा-पंधरा वर्षे काँग्रेसला राज्यात संधीच नाही असा टोला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना लगावला आहे. राज्याचा सर्व कारभार मुख्यमंत्री कार्यालयातूनच चालत असल्याने व मुख्यमंत्री आमचे मित्र देवेंद्र…

Read More

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्यभर ‘खोक्या’चे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली असून त्याला आज बीड येथे आणले जात आहे मात्र त्यापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर कारवाईचा बुलडोजर फिरवण्यात आला आहे. पैशाची बंडलं फेकणारा आणि पैसे उधळणारा खोक्याने वनविभागाच्या जागेवर काचेचा साज चढवलेलं घर बांधलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून खोक्याचे कारनामे समोर आले आणि खोक्याचं घर ही वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे असल्याचं समजलं आणि त्यानंतर वनविभागाने पोलिसांच्या मदतीने खोक्याचं घर जमीनदोस्त केलं आहे. ढाकणे कुटुंबाला केलेली मारहाण, हरिणांच्या शिकारीचा आरोप, वनविभागाच्या छाप्यामध्ये खोक्याच्या घरामध्ये सापडलेले शिकारीचे घबाड आणि वन्य प्राण्यांचा मांस.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करत घर बांधले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो. कुणालाही सोडले जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार, अशी एका वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज दिल्ली येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटसाठी बेठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दौऱ्यावर आहेत. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला चालना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील बोदवड येथे आज पहाटेच्या सुमारास गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहे. तसेच रेल्वेचे आपत्कालीन विभाग घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक टी एन 52- एफ -7472 आज दि. 14 रोजी सकाळी 4.45 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडून बोदवड कडे गहू घेऊन…

Read More

दादर : वृत्तसंस्था राज्यात आज होळीचा सण असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. यादरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही अपघाताची घटना प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली. प्रणय बोडके (29), करण शिंदे (29) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. यादरम्यान शिवनेरी बस चालक ब्रिजवरून समोरच्या दिशेने भरधाव वेगाने आला. यानंतर त्याने समोरून येणाऱ्या स्कुटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील तिघेही गंभीर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष व महिलांना मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा त्रास होत असतो मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, डिप्रेशन हे एक सामान्य मानसिक विकार आहे. हा विकार कोणालाही होऊ शकतो, आणि त्यामध्ये उदास होणे, यासारखी लक्षणे दिसू शकतात. चला, जाणून घेऊया डिप्रेशनची लक्षणे काय असतात. आजकालच्या अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका वाढला आहे. चिंता आणि डिप्रेशनच्या अनेक कारणांचा शोध घेता येतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक प्रमाणात मानसिक तणाव आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. चला, जाणून घेऊया डिप्रेशनच्या लक्षणांबद्दल. महिलांना डिप्रेशन अधिक होण्याचे कारणे WHO नुसार, डिप्रेशन कोणालाही होऊ शकतो, पण पुरुषांच्या तुलनेत महिलांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत. खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही.…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था तालुक्यातील वांगी येथे दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह अाईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गावातील शेतात घडला. त्यापैकी सहा तास शोधानंतर दोघांचे मृतदेह सापडले. एका मुलाचा शोध सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणले. चित्रा कविराज ऊर्फ दत्तात्रय हाके (२८) आणि स्वराज कविराज हाके (२) यांचा मृतदेह सापडला. पृथ्वीराज कविराज हाके (५) याचा शोध सुरू आहे. एक मुलगा गतिमंद व दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतिमंद…

Read More