Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुन्हेगारीच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतांना आता भाजप नेता योगेश रोहिलाने आपल्याच मुलांची हत्या केली. योगेश रोहिलाने आधी पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. पत्नी नेहा, मुलगा देवांशस शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये सांगठेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. योगेश रोहिलाला त्याच्या पत्नीवर संशय होता. पोलीस चौकशीत योगेश रोहिलाने सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला माहिती मिळालेली की, पत्नी नेहाच बाहेर कुठल्यातरी युवकासोबत अफेयर सुरु आहे. अनेकदा यावरुन दोघांमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील बजरंग बोगद्याजवळ गणपती मंदिर परिसरात जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. तसेच लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणी २३ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित हेमंत गुजर (वय १८, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) हा तरुण शनिवारी रात्री गणपती मंदिराजवळून जात असताना, संशयित आरोपी गणेश गोपाळ मराठे (रा. मयूर कॉलनी, जळगाव) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्याचा रस्ता अडवला. जुन्या वादातून गणेशने मोहितवर चाकूने हल्ला करून पाठीला गंभीर दुखापत केली. त्यानंतर…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर येथे औरंगजेबाची कबर हटवण्यावरून हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता, जो आज पूर्ण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीमध्ये असलेले हे घर फहीम खान यांच्या आईच्या नावावर आहे. इमारत आराखडा मंजुरी तील अनियमिततेबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती. खरं तर, औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना जमवण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. सध्या फहीम पोलिस कोठडीत आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी फहीम…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन,” असेही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला. “तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे,” अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका ३५ वर्षीय तरुणाने अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ वर्षीय आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली आपल्या परिवारासह जळगाव शहरातील एका परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी मनोज भीमराव धनगर (वय- २५ रा. जळगाव ) याने या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्याततक्रार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे कधीही बोललेले नाही. मात्र, सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नाही. परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ,” असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील सभेत केला. राज्याच्या १३ कोटी जनतेचा हिशोब सांभाळावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर, ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अजित पवार म्हणाले, “शासनाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३८, रा. कानसवाडा) यांच्या खूनप्रकरणी भरत भास्कर पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा दि. २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या भरत पाटील याला नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकों सागर बिडे यांनी ताब्यात घेतले.

Read More

भुसावळ  : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर अॅसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलांसह एका भागात वास्तव्याला आहे. सरकारी नोकरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल रहीम शेख (वय २७) रा. स्टेट कॉलनी, भुसावळ याने महिलेला संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तरुण व अल्पवयीन मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अजय सुभाष भिल (वय १९, रा. निपाणे, ता. पाचोरा) याने सप्टेंबर २०२४ मध्ये पळवून नेले होते. त्यांचा शोध घेत असताना पाचोरा पोलिसांनी दि. २२ मार्च रोजी त्यांना पुणे जिल्ह्यातील केडगाव येथून ताब्यात घेतले. लग्नाचे अमिष दाखवून या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने…

Read More

मेष राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. अशी काही घटना घडू शकते. यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. राजकारणात वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित काही बातम्या मिळतील. वृषभ राशी आज कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल. प्रेमप्रकरणात गोडवा राहील. अविवाहितांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. मिथुन राशी आज, कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा यामुळे तुमच्यासाठी मोठी अडचण देखील होऊ शकते. व्यवसायात एखादी मोठी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्काल बसेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सावध राहा. अन्यथा, तुम्हाला त्रास होऊ शकतो. कर्क राशी आज तुमची…

Read More