Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर हा अपघात नसुन घातपात झाल्याचा संशय मयताचा भाऊ याने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील बहिरम नगर येथील रहिवासी हर्षल बाबुलाल तडवी (वय – २६ वर्ष) या तरुणाचा मोंढाळे रोडवर २२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षल तडवी हा सायंकाळी मित्रास घरी सोडुन आपल्या घराकडे परतत असताना हर्षल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळुन आला. हर्षल यांचे डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून खुनाच्या घटना घडत असतांना आता वरणगावनजीक असलेल्या विल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रविवार (२३ मार्च) रोजी भल्या पहाटे समोर आली असून आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेखही चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई महापालिकापूर्वीच सर्वच पक्षातील नेत्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच मनसेच्या मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली. संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाची केंद्रीय समितीही जाहीर केली. राज ठाकरे यांनी संघटनेत पहिल्यांदाच एवढे मोठे बदल केले आहेत. केंद्रीय समितीची जबाबदारी नितिन सरदेसाई यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत नवीन पदांची रचना केली आहे. मनसेचे नते बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय गट अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यात उपचार घेत असलेले सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत असतांना आता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या बंद दाराआडच्या चर्चेवरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात आता दिशाच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानसवाडा-शेळगावचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (३८) यांच्या खूनप्रकरणी परेश उर्फ सोन्या भरत पाटील (२६) व देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील (२४) या दोघं भावांना अटक करण्यात आली. या दोघांचे वडिल भरत भास्कर पाटील हा पसार आहे. अटकेतील दोघांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ग्रामपंचायतच्या कामकाजाच्या जुन्या वादातून माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून केला होता. यातील देवेंद्र पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ रोजी अटक केली. दुसरा संशयित परेश पाटील याला नशिराबाद पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील विवरे येथे मेंढ्यांनी भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ४२१६) उटखेडा ते विवरे दरम्यान सबस्टेशनजवळ उलटला. या अपघातात ट्रकमधील १२५ पैकी २२ मेंढ्या ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, ट्रक इंदूरहून मेंढ्या घेऊन हैदराबादकडे जात होता. विवरे ते उटखेडे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून वाहन चालवणे जिकरीचे झाले असून, अपघातस्थळी असलेला मोठा खड्डाच अपघातास कारणीभूत ठरला. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या अपघातात चालक रईस खान (वय ४६), क्लिनर विजय (वय २७) आणि पवन (वय ३०) हे तिघे जखमी झाले…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील कुख्यात गुंड मुकेश भालेराव याची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये मयताची पत्नी सुरेखा मुकेश भालेराव हिचाही समावेश आहे. यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) हा भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल होते. या गुन्हेगाराचा १३ मार्च रोजी बेपत्ता झाल्यानंतर शोध सुरू होता. या घटनेनंतर मयताचा भाऊ अविनाश भालेराव याने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मनोज राखुंडे, जितू भालेराव, रोहन तायडे, सुरेखा भालेराव हिच्यासह दोन अल्पवयीन तरुणांविरुद्ध…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित बाबी सोडवल्या जाऊ शकतात, वैयक्तिक कामात व्यस्तता येईल. घरात धार्मिक कार्यक्रमांसह सकारात्मक ऊर्जा प्रबळ राहील. तुमच्या प्रत्येक योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी त्यांचा फायदा घेईल. दुसऱ्याच्या वैयक्तिक बाबींपासून स्‍वत:ला दूर ठेवा. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार सोडून द्यावा लागेल. तरुणांच्या करिअरच्या चिंता दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. एखादी समस्‍या परस्पर समंजसपणा सोडवाल. व्यवसायात राग तुमचा शत्रू बनू शकतो. मिथुन राशी आज तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची आणि विचारांची…

Read More