• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावकरांची  २०५६ पर्यंतची चिंता मिटली : आ.चव्हाण यांची जलमय भेट !

१५० कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच होणार सुरू..!

editor desk by editor desk
February 21, 2025
in चाळीसगाव, जळगाव, राजकारण, राज्य
0
चाळीसगावकरांची  २०५६ पर्यंतची चिंता मिटली : आ.चव्हाण यांची जलमय भेट !

चाळीसगाव / मुंबई – जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आहे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत २.० योजनेंतर्गत थेट गिरणा धरणावरून १५० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी गिरणा धरणावरून वाढीव ४.०२३ दलघमी बिगरसिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले असून जलसंपदा मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने आज दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर वासीयांची सन २०५६ पर्यंतची म्हणजे पुढील ३० वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे. हा पाणीदार निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार बिगर सिंचन मोठया प्रमाणात पाण्याच्या हक्क (Bulk Water Entitlement) मिळणेबाबत प्रस्ताव तापी पाटबंधारे विभागामार्फत जलसंपदा विभागाला देण्यात आला होता. यापूर्वी चाळीसगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्यासाठी पाणी वापर हक्काचे परिमाण ४.८६ दलघमी मंजूर आहे. आता जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मान्यतेने सदर योजनेसाठी सन २०५६ ची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव ४.०२३ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव वासियांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाढीव क्षमतेची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना मिळणार असून कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Previous Post

गोरेगाव फिल्मसिटीजवळ भीषण आग : अनेक झोपड्या जाळून खाक

Next Post

प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांमधील मतभेद वाढू शकतात

Next Post
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !

प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांमधील मतभेद वाढू शकतात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group