Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी असल्याने राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निकालात घट झाली असली तरी कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व कायम राखले आहे. कोकण – 94.14% पुणे – 91.25% अमरावती – 90.92% नाशिक – 90.72% मुंबई – 90.08% कोल्हापूर – 89.97% छत्रपती संभाजीनगर – 88.68% नागपूर – 88.67% लातूर – 84.14% (राज्यात शेवटचा) राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांना शनिवारी सकाळी ११:४५ वाजता अचानक सायरनचा मोठा आवाज ऐकू आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोबाईल स्क्रीनवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत एक संदेश दिसत होता, तर सायरन थांबल्यानंतर तोच संदेश मोबाईलद्वारे मोठ्याने वाचूनही दाखवण्यात आला. या अनपेक्षित अलर्टमुळे अनेक नागरिक घाबरले, तर काहीजण संभ्रमात पडले. मात्र, हा कोणताही धोका नसून ही केवळ आपत्कालीन संदेश प्रणालीची चाचणी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. ही चाचणी National Disaster Management Authority (NDMA) यांच्या वतीने करण्यात आली होती. NDMA ने २ मे रोजी देशभरात ‘सेल ब्रॉडकास्ट’ (Cell Broadcast – CB) तंत्रज्ञानावर आधारित आपत्कालीन अलर्ट प्रणालीची चाचणी केली. या…

Read More

मुंबई | प्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, असे संजय राऊत म्हणतात; कदाचित ते काही अंशी खरेही असू शकते. कारण सध्याची राजकीय परिस्थिती जात, धर्म आणि पैशांकडे झुकली आहे,” असे म्हणत त्यांनी राजकारणातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले. बच्चू कडू पुढे म्हणाले की, “मी शिवसेनेत प्रवेश हा मजबुरीमुळे केलेला नाही, तर बदललेल्या परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय आहे. गेली 25 वर्षे मी जनतेलाच माझा नेता मानत आलो. मात्र, निवडणुकीत आमच्या ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे वळण घेतले. काही भाजपमध्ये गेले, काही…

Read More

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवासात वाढ होणार असून, तिकीटावर प्रति प्रवास 2 रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’ आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ व दर्जेदार सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कायापालटाचा आराखडा जाहीर केला. गेल्या काही वर्षांत बसस्थानकांवरील अस्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने स्वच्छता सुधारण्यासाठी हा अधिभार लागू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जमा होणारा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार असून, त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत 1 जूनपासून सर्व एसटी स्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहेत.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उजेडात आली होती. या मृत्यूंमुळे राज्यासह देशात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या नावाने म. धर्मादाय उपायुक्त जळगाव येथे मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी हा संस्थेचा सर्वसाधारण सभासद देखील नसताना त्याने संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून बनावट व खोटे फेरफार अर्ज क्र. 102/2015 दाखल केले होते. म. धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी दि. 08/04/2026 रोजी सदर बनावट व खोटे फेरफार अर्ज नामंजूर केले आहे. धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी तर्फे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. शफी अहमद भाईमिया काजी यांनी हरकत घेतली होती. यांच्या तर्फे ॲड. डी. ओ.पाटील यांनी बाजू मांडली. खोटे शिक्के बनवल्या प्रकरणी मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी व ईतर…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१ मे २०२६  मेष राशी उत्पन्नाचे मोठे पर्याय उघडतील आणि नवीन संधी निर्माण होतील. आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून रहा. आज वाईट संगत तुमच्या कामात अडथळा आणू शकते. तुमची नोकरीतील स्थिती मजबूत राहील, व्यावसायिक व्यवहार तेजीत राहतील आणि कौटुंबिक संबंध सुखकर राहतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळगा. मनोबल उंचावण्यासाठी, भगवान शिवाचे ध्यान करून आपल्या दिवसाची सुरुवात करा. वृषभ राशी आज तुमच्या मेहनतीला आणि धैर्याला यश मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल. आज लोकांशी सहजतेने वागा. कामासाठी हा अनुकूल काळ आहे आणि व्यवसायही फायदेशीर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. युवा हे मानव संसाधन विकासाचे मुख्य स्त्रोत मानले जातात. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पाहता त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास करून युवकांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडण्यासाठी प्रतिवर्षी 1 मे रोजी जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी केलेल्या जळगाव जिल्ह्यातील युवकांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने मागविण्यात आले होते. या प्रस्तावांची छाननी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सन 2025-26…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले. शिंदे म्हणाले की, “लढायची वेळ आली की काहीजण स्वतः पुढे न येता इतरांना पुढे करतात,” असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार न देण्यामागे ‘अंतरआत्म्याचा आवाज’ असल्याचे सांगितल्यावर शिंदेंनी त्यावरही उपरोधिक टीका केली. “आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यातून आवाज येतो का? २०१९ ला तो आत्मा कुठे होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी केवळ १०च अर्ज…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन आता विनामूल्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात केंद्रीय विद्यालयांच्या उभारणीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत, शासकीय जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने आणि पूर्णतः महसूलमुक्त स्वरूपात केंद्रीय विद्यालय संघटनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी २ हेक्टर ५० गुंठे जमीन निश्चित करण्यात आली आहे.…

Read More