धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १३ मार्च २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलाचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे घातपात होता. याचा तपास करण्यासाठी तब्बल दोन महिने २० दिवसांनंतर मंगळवारी प्रशासनाने पुरलेला मृतदेह बाहेर काढून सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे. रेल येथील गणेश पाटील हा पाळधी येथील शाळेत सहावीत शिक्षण घेत होता. १३ मार्च रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास गावातील मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी गणेश अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे त्याच्या सोबतच्या मुलांनी…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि. ३ जून २०२६ मेष राशी तुमचा एखादा खूप जवळचा नातेवाईक अचानक तुमच्या घरी येऊ शकतो. घरात आनंद पसरे. तुम्ही दिवसभर आनंदाने गप्पा मारत वेळ घालवाल. तुम्ही काही खास पदार्थ बनवाल आणि सहलीची योजना आखाल. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न जुळू शकतं. तुमच्या नोकरीत प्रगति होील, पगारवाढीची लवकरच शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. मेष राशी तुमचा एखादा खूप जवळचा नातेवाईक अचानक तुमच्या घरी येऊ शकतो. घरात आनंद पसरे. तुम्ही दिवसभर आनंदाने गप्पा मारत वेळ घालवाल. तुम्ही काही खास पदार्थ बनवाल आणि सहलीची योजना आखाल. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न जुळू शकतं. तुमच्या नोकरीत प्रगति होील,…
भुसावळ : प्रतिनिधी येथील बाजारपेठ परिसरात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले (कट्टे) आणि एक धारदार गुप्ती जप्त केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री केली. पोलिसांना आलिशान वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत एक तरुण शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता संशयिताने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. अटक केलेल्या तरुणाचे नाव भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) असे आहे. त्याची झडती घेतली असता अंदाजे ५० हजारांचे दोन गावठी कट्टे, एक हजार रुपयांची…
जळगाव : प्रतिनिधी शॉर्टसर्कीटमुळे चटई कंपनीच्या गोडावूनला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत आजूबाजूच्या तीन कंपन्यांना देखील विळख्यात घेतले. या आगीमुळे एका कंपनीतील पाच गॅस सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला होता. यामध्ये कंपनीत तयार झालेल्या मालासह मशिनरी जळून खाक झाले. आग ही चौथ्या कंपनी पर्यंत पोहचणार त्यापुर्वीच नियंत्रण मिळविल्यामुळे ती कंपनी सुरक्षीत राहीली. ज्याठिकाणी ही आग लागली त्याच्या समोर गॅस सिलींडरचे गोदाम आहे. आग लागल्यानंतर सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात खळबळ माजून गेली. परंतू कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गॅस गोडावूनच्या बाहेर असलेल्या वाहने तात्काळ तेथून दूर अंतरावर नेवून उभी केली. ही घटना शनिवार दि. २ मे रोजी दुपारी…
जळगाव : प्रतिनिधी धानोरा येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकीचा अपघात होऊन अक्षय संजय देशमुख (२७, रा. कांचननगर) हे ठार झाले. तसेच त्यांचे मित्र गणेश सावळाराम पवार (४०, रा. रायपूर, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (१ मे) मध्यरात्री १२ वाजता कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉनजवळ झाला. दरम्यान, या प्रकरणात मयताच्या भावाने घातपाताचा संशय व्यक्त केला असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांचननगरमधील रहिवासी अक्षय देशमुख व गणेश पवार हे दोघे धानोरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते दुचाकीने घरी परतत असताना मध्यरात्री १२ वाजता कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉनसमोर खालीवर असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी…
वरणगाव : प्रतिनिधी काळबांडे वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या मुलीचे लग्न निश्चीत झाले. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण असताना लग्नाच्या दिवशीच दि. १ मे रोजी सकाळी मुलीचे काका सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून गव्हाणकर परिवारात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) हे हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सदाशिव हे लवकर झोपी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेच नाहीत. झोपेत हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. लग्न मंडपातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले. लग्नाचाच दिवस असल्याने आधी मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न लावण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन नंदुरबार जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीवर जळगावातील भागवत गोविंदा चव्हाण (रा. वाघ नगर) याने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तरुणीने विरोध केला असता, तिला जबर मारहाण करून तिचा मोबाइल व कागदपत्रे लांबवली. ही घटना १० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हा दाखल होऊन तो जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ३० एप्रिल रोजी वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील एक २६ वर्षीय तरुणी खासगी नोकरीसाठी जळगावात राहते. तिची भागवत चव्हाण याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत १० एप्रिल रोजी रात्री त्याने सदर तरुणीला खोटे नगर परिसरातील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर…
आजचे राशिभविष्य दि.३ मे २०२६ मेष राशी ज्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांना नक्कीच यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. आज तुम्ही उत्साही आणि निरोगी राहाल. तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत जेवायला किंवा फिरायला बाहेर गेल्याने तुम्हाला मनःशांती आणि आनंदी मनःस्थिती मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून विशेष सन्मानही मिळू शकतो. वृषभ राशी दीर्घकाळच्या समस्येचे आज निराकरण होऊ शकते. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही जुन्या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न कराल. आज जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल, तेव्हा तुम्ही कधीही कल्पना न केलेली व्यक्ती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेतून सुमारे 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी मासिक आर्थिक मदत थांबण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून लाखो महिलांना याचा थेट लाभ झाला होता. मात्र, कालांतराने काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची प्रकरणे उघडकीस…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे संकेत देणारे विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगताना त्यांनी 2029 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकतात, असे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीच्या भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, राजकारणात कोणतेही कायमस्वरूपी बंधन किंवा करार नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. त्यामुळे 2029 ला भाजप किंवा शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. यामध्ये काहीही गैर नसून, प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते पुढे म्हणाले की, भूतकाळात…

