Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी निवडणूक विषयक कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरातील १३ बीएलओ कर्मचाऱ्यांवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४) यांनी ३ जून रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. भुसावळ सत्र न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. गुरुवारी न्यायालयाने अंतिम निकाल देताना स्पष्ट केले की, ‘हा गुन्हा अत्यंत गंभीर, क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात चार निष्पाप भावंडांच्या निघृण हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला (२६, रा. केहऱ्हाळे, ता. रावेर) याला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष जलद न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. यादव यांनी गुरुवारी हा निकाल दिला. हे हत्याकांड १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडले होते. बोरखेडा गावाजवळ एका शेतात एक दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह सालदार म्हणून वास्तव्यास होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी हे दाम्पत्य काही आपल्या मूळ गावी (मध्य प्रदेश) गेले होते. याचा गैरफायदा घेत महेंद्र बारेला याने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला; तसेच पीडितेच्या तीन निष्पाप भावंडांवरही कुन्हाडीने सपासप वार केले. १६ ऑक्टोबरच्या सकाळी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.५ जून २०२६ मेष राशी आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल, नशिबाची साथ मिळेल. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईलय. तुम्ही एखाद्या मनोरंजनाच्या किंवा विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल. तुमच्या वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांचा आनंद घ्याल. तुमचे मूल त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडेल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वृषभ राशी तुम्हाला एका शुभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आनंद होईल. आज तुमच्या बोलण्यामुळे आई नाराज होऊ शकते, म्हणून तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चार वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधातून १९ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन संशयित तरुणाने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीच्या चावीने तरुणीच्या पाठीवर मारुन तिला जखमी केले. तसेच तरुणी कोणासोबत बोलते हे तीने सांगितले नाही तर संशयिताने तरुणीच्या घरातच फाशी घेवून तरुणीला मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिससरात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती एका केक शॉपमध्ये काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. गेल्या काही वर्षांपासून ती तरुणी संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याला ओळखत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील वाघ नगर भागात १ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणावर सुरुवातीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर संबंधित तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार,  राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी हर्षल संतोष घुगे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) याने तक्रार दिली. फिर्यादीतील माहितीनुसार, १ जून रोजी तो आणि त्याचे मित्र राहुल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये शारीरिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या गंभीर प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापती नगर), जय चौधरी (शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत तरुणी आणि तिची मैत्रीण या दोघी जळगावच्या एका शाळेत एकत्र शिक्षण घेत होत्या.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात कार चालवून तब्बल ८ ते ९ जणांना जोरदार धडक दिल्याची घटना ३ जून रोजी, सायंकाळी ७.३० वाजता घडली. या अपघातात दोन दाम्पत्य आणि एक तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाच्या भीतीने या अल्पवयीन चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. बुधवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर रस्त्यावर नेहमीप्रमाणे नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. याच वेळी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रामानंदनगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने भरधाव वेगात एमएच १५ एफटी ७२०१ क्रमाकांची कार चालवत येत होता. रामानंदनगर परिसरातील चर्चजवळ आल्यावर…

Read More

आजचे राशिभविष्य दि.४ जून २०२६ मेष राशी आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल, नशिबाची साथ मिळेल. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईलय. तुम्ही एखाद्या मनोरंजनाच्या किंवा विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल. तुमच्या वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांचा आनंद घ्याल. तुमचे मूल त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडेल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वृषभ राशी तुम्हाला एका शुभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आनंद होईल. आज तुमच्या बोलण्यामुळे आई नाराज होऊ शकते, म्हणून तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी  तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदीपात्रात बुडून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यश अशोक भालेराव (१५, रा. किनगाव, ता. यावल) असे या मुलाचे नाव असून, पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  किनगाव येथील रहिवासी असलेला यश हा जळगाव शहरात एका वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत होता. सोमवारी तो जळगावहून आपल्या मामाच्या गावी किनगावला जाण्यासाठी निघाला होता. वाटेत विदगावजवळ तो आपल्या मित्रांसोबत तापी नदीच्या पात्रात उतरला. मात्र, हे धाडस त्याच्या जीवावर बेतले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा काहीसा गतिमंद होता तसेच त्याची दृष्टीही अधू होती. त्यामुळे नदीपात्रात खेळत असताना त्याला पाण्याच्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी व्हीआयपी रात्री कॉलनी परिसरात २९ मे रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगेश अंबादास काळे (२६, व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात सुरुवातीला जीवघेणा हल्ला व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली.घटनास्थळी नागरिक जमा होऊ लागल्याने आरोपी तेथून पसार झाले. जखमी मंगेश यांना मित्रांच्या मदतीने भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात…

Read More