धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी (दि. २८ एप्रिल) सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे निघालेल्या क्रूझर गाडीचे चालत्या स्थितीत चाक निखळल्याने गाडी उलटली. या दुर्दैवी घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसोबत माहेरी अकोल्याकडे परतत होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने घात केला. बुधवारी सकाळी क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) वराड गावाजवळून जात असताना अचानक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कारमधून आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे शटरच्या कुलूप तोडून मेडीकलसह हार्डवेअरच्या दुकानातून रोकडसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिव्हीआर असा एकूण १२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नागरिकांसह पोलिसांनी चोरट्यांचा कारचा पाठलाग केला. मात्र चोरटे त्यांना गुंगारा देत पसार झाले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिलपुरा पोलीस चौकीसमोर दिलीप अनंत वाणी यांचे पद्मालय मेडीकल नावाचे दुकान आहे. मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमधून तीन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. त्या चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या पट्टया कापून शटर उचकावून आत शिरले. त्यांनी दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली पाच हजारांची रोकडसह…
जळगाव : प्रतिनिधी जळगावकडून कुसुंब्याकडे जाणाऱ्या मार्गावर रेमंड चौफुलीजवळ मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने कारचालकासह एका महिलेचा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री सुमारे १२:४५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १२ वाय.ए. ८१७) क्रमांकाची कार कुसुंब्याकडे जात असताना रेमंड चौफुलीजवळ अचानक अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबर होता की कारचे मोठे नुकसान झाले असून, वाहनातील चालक आणि महिला गंभीर जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. तसेच एमआयडीसी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर काही…
जळगाव : प्रतिनिधी शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलात वेळेचे भान राखले जावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक पाऊल उचलत थेट उपस्थिती तपासणी केली. या तपासणीत उशिरा कामावर येणाऱ्या तब्बल ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या पगार कपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धिवरे यांनी कार्यालयीन शिस्तीवर विशेष भर दिला आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी विविध शाखांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेनंतर कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले. या तपासणीत ३७ जण उशिरा आल्याचे स्पष्ट…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा येथील लघुपाटबंधारे म्हसास धरणाजवळ दुचाकी अपघातात अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रमेश भिल्ल (वय १७) व भुऱ्या ऊर्फ मयूर साहेबराव भिल्ल (वय १९, दोघे रा. लोहारा) हे दुचाकी (क्र. एमएच ०३ एव्हाय ३५५५) वरून जात असताना म्हसास धरणाजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात विजय भिल्ल याचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर भिल्ल गंभीर जखमी झाला आहे. विजय भिल्ल याची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याचे आई-वडील लहानपणीच निधन झाल्याने…
आजचे राशिभविष्य दि.२९ एप्रिल २०२६ मेष राशी आजचा दिवस मान आणि आदरासाठी उत्तम असेल. अनपेक्षितपणे गमावलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा एक चांगला दिवस असेल. आज कर्ज आणि व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगा. कोणतेही बदल करण्यापूर्वी किंवा नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा; घाई टाळा. आज नातेसंबंध खूप नाजूक असतील, त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे आरोग्य मध्यम राहील. वृषभ राशी आजच्या दिवसाचा पुरेपूर उपयोग करा; तुम्ही तुमच्या सर्जनशीलतेने आणि कलात्मक अभिव्यक्तीने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. आज व्यवसायात नफा होईल आणि तुम्हाला आर्थिक प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात ५ किंवा ७ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच १५ मेपूर्वी दहावीचा निकालही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पार पडल्या. यामध्ये बारावीच्या परीक्षेला ३७ हजार ३३८, तर दहावीच्या परीक्षेला ३२ हजार ४३३ विद्यार्थी बसले होते. परीक्षा संपल्यानंतर निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. सुरुवातीला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तलाव संवर्धन प्रकल्पांबाबत सरकारने मोठा निर्णय घेत एकूण 14 प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हा आदेश जारी केला असून या विभागाची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. या निर्णयामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर झाले होते, तर उर्वरित 3 प्रकल्प महावीकस आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले होते. त्यामुळे सत्ताधारी घटकांमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या निर्णयानुसार, संबंधित प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेला निधी व्याजासह परत वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय…
पुणे : वृत्तसंस्था क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेच्या वसुलीवरून एका खासगी बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून ग्राहकाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित एजंट व बँकेविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील 15 नंबर चौकात सोमवारी ही घटना घडली. एका खासगी बँकेचे दोन रिकव्हरी एजंट थकीत क्रेडिट कार्ड बिलाच्या वसुलीसाठी संबंधित ग्राहकाला भेटण्यासाठी आले होते. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि एजंटांनी ग्राहकाला भररस्त्यात बेदम मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोर लाथाबुक्क्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी ट्रक लावून घरी पायी परतत असताना भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले चालक मोहंमद मुसा शेख (५९, रा. तांबापुरा) यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. मोहंमद मुसा शेख यांनी २५ एप्रिल रोजी, एमआयडीसी परिसरात ट्रक लावला व मुलाला घेण्यासाठी बोलविले. ते रस्त्याने पायी घरी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती. मुलगा दुचाकी घेऊन त्यांना घेण्यासाठी जात असताना त्याला ही गर्दी दिसली व काय झाले म्हणून पाहण्यासाठी थांबला. मुलाला वडिलांचाच अपघात झाल्याचे दिसले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २७ रोजी…

