जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ‘प्रहार’ संघटनेचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा राजकीय निर्णय घेण्यात आला. या प्रवेशासोबतच शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात झाली आहे. प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला. “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. त्याच विचाराने आम्ही आज शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी निश्चितीची लगबग पूर्ण झाली आहे. विविध पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करताच निवडणुकीचा रंग अधिक चढला आहे. महायुतीकडून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपने सहा उमेदवारांची फळी जाहीर करत ताकद दाखवली आहे. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक) यांचा समावेश आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील जवाहर हौसिंग सोसायटीमधील आनंद नथ्थू भोई (वय ३४) या तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. शहरात यंदा उन्हाळ्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नथ्थू भोई हे दररोज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी भाजी विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे आजही ते आपल्या दुकानावर भाजी विक्रीसाठी आले होते. मात्र, सकाळी १० वाजेनंतर अचानक त्यांना चक्कर आली अन् ते दुकानावर असतानाच कोसळले. ही बाब परिसरातील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत आनंद भोई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित…
एरंडोल : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यानजीक आज सकाळी भरधाव वेगातील एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात बसमधील एकूण १८ जण जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून भुसावळकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस (एमएच-२०, बीएल-३४१२) आज सकाळच्या सुमारास भालगाव फाट्याजवळून जात असताना हा अपघात घडला. बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा एक कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते.…
जळगाव : प्रतिनिधी कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २८ एप्रिल रोजी समोर आली असून शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले संतोष श्यामलाल आटवाल (वय ४०, रा. गुरुनानक नगर) यांच्या मामेभावाचे लग्न मालेगाव येथे असल्याने आटवाल कुटुंब २६ एप्रिल रोजी घर बंद करून लग्नासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाला लावलेले कुलूप तोडून…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियात खोट्या पिस्तुलासह (एअर गन/नकली शस्त्र) फोटो व व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेतन गोल्हार याने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसारित केली होती. यामध्ये त्याने हातात पिस्तूल घेऊन समाजात भीती व दहशत निर्माण होईल असे वर्तन केले होते. ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरल्याने शहरात चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावरील या प्रकाराची चाळीसगाव शहर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी रात्री पोलिसांनी संशयित…
आजचे राशीभविष्य दि. ३० एप्रिल २०२६ मेष राशी आजचा दिवस नवीन शक्यता आणि संधींनी भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही अडचणींना सामोरे जाऊन तुमची ध्येये साध्य करू शकाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी, तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि घाईचे निर्णय घेणे टाळा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा; यामुळे तुमच्या नात्यात जवळीक निर्माण होईल. मेष राशी आजचा दिवस नवीन शक्यता आणि संधींनी भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही अडचणींना सामोरे जाऊन तुमची ध्येये साध्य करू शकाल. कुटुंबासोबत वेळ…
जलसंवर्धनाचा जागर, जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती चाळीसगाव : प्रतिनिधी दक्षिणेकडील खान्देशाचे प्रवेशव्दार असणा-या चाळीसगावात मंगळवारी कन्नड घाटाच्या पायथ्याशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गगनभेदी गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि चौंडी येथून प्रारंभ झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे दूपारी जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले असून तिचा खान्देशात प्रवेश झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खा. रामराव वडकूते, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह हजारो जलयात्री यांची प्रमुख उपस्थिती होती. बंजारा समाजबांधवांनी देखील यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिल,2026 रोजी बनारस–पुणे (हडपसर) व अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. दिनांक 29 एप्रिल,2026 रोजी भुसावळ विभागात या गाडीचे स्वागत व उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. तर जळगाव स्थानकावर खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांच्यासह रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात गॅस एजन्सींच्या गोडाऊन फोडून मोठ्या प्रमाणात सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली. फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतून १०० गॅस सिलेंडर तर वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही…

