अमळनेर : प्रतिनिधी
रेल्वे स्थानकावर १६ रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ विभागातील एएसआय जयपाल सिंग यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ जयपाल सिंग यांची १५ रोजी रात्री ८ ते १६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अमळनेर स्टेशनवर ड्युटी होती. रात्री १२ ते १ वाजेदरम्यान सिंग यांनी रिव्हॉलव्हर आपल्या उजव्या बाजूला कपाळावर लावले आणि त्यातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या कपाळातून आरपार डाव्या बाजूला निघाली. त्यानंतर ते धाडकन खाली कोसळले. त्यांच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहत होते. दरम्यान, घटनेनंतर तेथे उपस्थित सहकारी, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तत्काळ जखमी जवानाला वैद्यकीय उपचारासाठी नर्मदा फाऊंडेशनमध्ये हलवले.
तेथे डॉ. अनिल शिंदे यांनी प्राथमिक प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील सेवा हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच नंदुरबार येथून एपीआय राहुल शेजवळ प्रभारी अधिकारी प्रदीप सोनवणे यांन घटनास्थळी भेट देत पंचनामा केल त्यांना भय्या ठाकूर यांनी सहकार्य केल दरम्यान, मनमाड येथून फॉरेन्सिक पथव रक्ताचे नमुने तपासण्यासाठी आत होते. गोळी जवानाच्या कपाळातू सरळ कार्यलयाच्या भिंतीला जाऊ आदळली. तेथील रक्ताचे नमुने गोळ करून पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, आत्महत्याचा त्यांनी प्रय का केला, याचे नेमके कारण अद्याप स्प झालेले नाही. तर, काही दिवसांपूर्वी त्यांन निलंबित करण्यात आले होते. ७ जूनल ते कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांच्य नातेवाईकांना बोलावण्यात आले असू या प्रकरणाची चौकशी सुरू असल्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळ रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध् खळबळ उडाली आहे.



