Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबादमध्ये महायुतीची दमदार मोर्चेबांधणी; नंदकिशोर महाजनांना विजयी करण्याचा निर्धार
    जळगाव

    नशिराबादमध्ये महायुतीची दमदार मोर्चेबांधणी; नंदकिशोर महाजनांना विजयी करण्याचा निर्धार

    editor deskBy editor deskJune 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले.

    या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.

    विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्या : नगराध्यक्ष योगेश पाटील
    नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे. असे सक्षम नेतृत्व विधान परिषदेत गेल्यास शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल.”

    आमदार व जिल्हाध्यक्षांचे आवाहन
    या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनीही उपस्थित नगरसेवकांना नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या भेटीमुळे नशिराबादमध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    उकाड्याचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरातून ७३ हजारांचा ऐवज लंपास !

    June 17, 2026

    अमळनेर रेल्वे स्थानकावर खळबळ; आरपीएफ जवानाचा सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्येचा प्रयत्न

    June 17, 2026

    सावद्यानजीक भीषण अपघात; कारने उडवले सहाजण, एकाचा जागीच मृत्यू

    June 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.