
चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ३४ वर्षीय युवक ९ ऑगस्टपासून बेपत्ता असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या आईने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्वप्निल गोरख पाटील असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सुरेखा गोरख पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्निल पाटील हा वाघडू येथील तांत्रिक माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीस आहे. ९ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला. त्यावेळी त्याच्याकडे त्याचा मित्र साहिल उर्फ शुभम अशोक रणदिवे याची पल्सर ही दुचाकी असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. स्वप्निलचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा चाळीसगाव शहरासह नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळाल्याने १० ऑगस्टला चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.



