जळगाव : प्रतिनिधी घरातील सांडपाणी अंगणात सोडत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन लोखंडी रॉड तसलीमा बी शेख हसन यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल – चौकात शेख मोहसीन शेख हसन (वय ३८) – हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांची आई, पत्नी व बहिण हे – घरासमोर असतांना त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना तुमचे – घराचे सांडपाणी आमच्या अंगणात का सोडता असे विचारले. त्यांनी लागलीच शेख मोहसीन यांच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात…
Author: editor desk
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई; उपचाराचे साहित्य व औषधी जप्त, संशयित ताब्यात जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही वैद्यकीय परवाना अथवा संबंधित पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या संशयित बोगस डॉक्टरवर पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. परीविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या पथकाने बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती कोणताही वैद्यकीय परवाना किंवा मान्यताप्राप्त पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर परीविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांनी संबंधित ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद शहरातील मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन तरुण दरोडेखोरांनी घरात अचानक प्रवेश करून सुरी आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवत कुटुंबीयांना धमकावले. दागिने व रोख रक्कम काढून देण्याची मागणी करत घरातील सदस्यांना दहशतीत ठेवण्यात आले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घरातील कारची चावी घेतली आणि कारसह घटनास्थळावरून पलायन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तेश्वर नगर परिसरातील भादली रोडवर पोलीस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. गणेश कोळी हे विष्णूनगर पोलीस ठाणे, डोंबिवली येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागून सुभाष सीताराम महाजन (४७, रा. हरिविठ्ठल नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १२ जुलै रोजी शहरातील खंडेराव नगर जवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान खंडेरावनगर जवळील खांबा क्रमांक ४१६/९ ते ४१६/११ दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर असल्याची माहिती उप स्टेशन प्रबंधकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ जितेंद्र राठोड हे घटनास्थळी पोहचले. काही वेळानंतर मयताचे नातेवाईकही तेथे आले व त्यांनी ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जितेंद्र राठोड…
जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाखांचे मॅफेड्रोन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून कारवाईची कुणकुण लागताच त्या दोघांना ड्रग्ज पुरवठा करणारा पेडलर भैय्या सोनवणे हा तेथून पसार झाला. पोलिसांकडून पेडलराचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कांचननगरातील घराची झाडाझडती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी. एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एम.डी. ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईचे कुणकुण लागताच अंधाराचा फायदा घेत मुख्य ड्रग्ज पेडलर भैय्या सोनवणे हा पसार झाला तर घटनास्थळाहून…
जळगाव : प्रतिनिधी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमूना नगरसह कांचन नगरातील बिंदूबाई हॉल येथे दोन अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू होती. शनिपेठ पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत दोघांचे बालविवाह रोखले आणि वधू-वरांच्या आई-वडिलांना समज दिली. अन्य गावातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमुनानगर व कांचननगरमधील तरुणांशी दोन वेगवेगळ्या दिवशी लावला जात होता. याबाबतची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक प्रिया दातीर, संतोष खेडकर, पोहेकों विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, नीलेश घुगे, नत्वजीत चौधरी, संभाजी पाटील गणेश ढाकणे यांनी वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालविवाह…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील किनगाव येथे मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या प्रकरणाने पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर खुनाचे गंभीर स्वरूप धारण केले. साडेतीन वर्षांच्या अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार मारल्याचा, तसेच त्याच्या आईलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पती आणि सासूवर करण्यात आला असून, याप्रकरणी यावल पोलिसांनी खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) या ७० टक्के दृष्टिहीन महिलेसह तिचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती या गंभीर जखमी झाल्या, तर…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील कठोरा बुद्रूक शिवारात शेतात तुर पेरणीचे काम करत असताना अचानक वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २९) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव खिलेश किशोर कोळी (वय २१) असे असून तो कठोरा बुद्रुक येथील गट क्रमांक ६० मधील शेतात वडील व मजुरांसोबत तुर पेरणीचे काम करत होता. सकाळपासून कपाशी व व तुर पेरणी तसेच ट्रॅक्टरने शेतात सऱ्या पाडण्याचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ आकाश, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू असतानाच…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोलीजवळील सार्वजनिक विद्यालयासमोर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार ३७ वर्षीय प्रौढ ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मयत प्रौढ हे चिंचोली येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली गावातील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सार्वजनिक विद्यालयासमोरच श्री क्षेत्र मनुदेवी फाटा आहे. या फाट्यावर दुचाकी (एमएच १९, एक्यू ३१६६) ने चिंचोली येथील विजय राजेंद्र सपकाळे (वय ३७) हे जात होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एमपी ०९, एचजी ९५६५) ने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सपकाळे हे जागीच ठार झालेत. या प्रकरणी…
जळगाव : प्रतिनिधी गावाकडून येणाऱ्या रस्त्याने न येता गिरणा नदीपात्राकडून येऊन चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीच चोरून नेली. त्यानंतर काही अंतरावर ती फोडून त्यातील ५५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना २७ जून रोजी आमोदा, ता. जळगाव येथील एकवीरा माता मंदिरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आमोदा येथे एकवीरा मातेचे मंदिर असून याठिकाणी असलेल्या दानपेटीत अनेक दिवसांपासूनची रक्कम जमा झाली होती. २७ जून रोजी मध्यरात्री चोरटे गावाकडून येणाऱ्या रस्त्याने न येता मंदिराच्या मागे असलेल्या गिरणा नदी पात्राकडून येणाऱ्या रस्त्याने मंदिराजवळ पोहचले. त्यानंतर स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून ते मंदिरात उतरले. तेथून त्यांनी…

