Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पेन्शनच्या ऑफरची लिंक उघडली अन् खात्यातून ३.८५ लाख ट्रान्सफर; जळगावात सायबर फसवणूक
    क्राईम

    पेन्शनच्या ऑफरची लिंक उघडली अन् खात्यातून ३.८५ लाख ट्रान्सफर; जळगावात सायबर फसवणूक

    editor deskBy editor deskSeptember 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    युट्युबवर पेन्शनकार्डची ऑनलाईन ऑफरचा टाक्स दिला. त्यानंतर पाठविलेल्या लींकद्वारे पेशन कार्ड ओपन करण्यास सांगत इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रोफेसर राजेंद्र विश्वनाथ पाटील (वय ५९, रा. सदाशिवनगर) यांच्या खात्यातून ३ लाख ८५ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेत त्यांची फसवणुक केली. ही घटना दि. १३ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी दि. २८ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सदाशिवनगरात राहणारे राजेंद्र पाटील हे गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी ते युट्युब बघत असतांना त्यांना ए. यू. स्मॉल ऑफाईनन्स बँकेच्या पेन्शची अॅड दिली. त्यांनी तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना विमान प्रवासात ५० टक्के सुट व कॅश बँक मिळेल असे अमिष दाखविले. दरम्यान, समोरील व्यक्तीला राजेंद्र पाटील यांनी मॅसेजद्वारे त्यांच्या बँक खात्याची संपुर्ण माहिती देखील सांगितल्यानंतर संबंधितांना त्यांनी त्यांचे पेन्शन खाते तयार करुन देण्याची मान्यता देखील दिली.

    राजेंद्र पाटील यांना शंका आल्याने त्यांनी दि. १३ रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांची फसवणुकीची रक्कम परत केली जाईल याची वाट बघितली. मात्र त्यांना पैसे परत न मिळाल्यामुळे त्यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि डॉ. विशाल जयस्वाल हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गिरणा धरणात १०० टक्के पाणीसाठा, मग शेतकऱ्यांना एकच आवर्तन का? आमदार किशोर पाटील आक्रमक!

    November 23, 2026

    ‘कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही वेळेवर पाणी मिळाले पाहिजे!’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    November 23, 2026

    शेतीच्या व्यवहारातून रक्तरंजित वाद; डॉक्टरांचा खून करून मृतदेह बहुळा धरणात फेकल्याची कबुली!

    November 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.