Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहनाच्या अपघातात भुसावळचे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पाचपांडे यांचे निधन !
    क्राईम

    वाहनाच्या अपघातात भुसावळचे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पाचपांडे यांचे निधन !

    editor deskBy editor deskOctober 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    पिकअप वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भुसावळ पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश आनंदराव पाचपांडे (वय ६७, रा. नाहाटा कॉलेजजवळ, पियुष कॉलनी, भुसावळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर भुसावळ येथील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.४५ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  प्रकाश पाचपांडे हे १ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून राजस्थान मार्बल परिसरातून आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी पिकअप चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार घडक दिली. या अपघातात पाचपांडे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस तसेच वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केली.

    गंभीर जखमी अवस्थेत पाचपांडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली आणि ४ ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास एएसआय जगन सोनवणे करीत आहेत. प्रकाश पाचपांडे यांनी पोलीस सेवेत भुसावळ शहर, बाजारपेठ यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावले होते. सेवाकाळात कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून काम करताना त्यांनी सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. सेवानिवृत्तीनंतरही पोलीस बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती कायम होती. मनमिळावू आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे पोलीस वर्तुळात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. पाचपांडे हे जळगाव निवृत्त पोलीस संघटनेच्या ‘अमरदीप योजना’ चे सभासद होते. त्यांच्या निधनानंतर या योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रोखठोक स्वभावाचे अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन !

    October 8, 2026

    धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी !

    October 7, 2026

    पिक विम्याच्या लाभाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; कृषी विभागाकडे चौकशीची मागणी

    October 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.