Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तापी नदीत तरुण दाम्पत्याचे मृतदेह; पायांना साखळी अन् कुलूप! आत्महत्या की हत्या?
    क्राईम

    तापी नदीत तरुण दाम्पत्याचे मृतदेह; पायांना साखळी अन् कुलूप! आत्महत्या की हत्या?

    editor deskBy editor deskOctober 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी व हल्ली एंडोल तालुक्यातील उत्राण येथे राहणाऱ्या तरुण जोडप्याचा तापी नदीत पायांना साखळी लावून कुलूप लावलेल्या अवस्थेत बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ठरवून आत्महत्या की नियोजित हत्या, याबाबत चर्चेला उत आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पाडळसरे येथील मूळ रहिवासी श्याम हरी पाटील (वय २८, ह. मु. उत्राण) आणि त्यांची पत्नी सपना पाटील (क्य २०) हे ८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शिवारात तापी नदीत पायाला लोखंडी साखळी व कुलूप लावलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आले. या संदर्भात नरडाणा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस व पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन दोघांना पाण्याबाहेर काढले. तसेच पंचनाम्याचे काम पूर्ण केले. दरम्यान, श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय साखळीने एकत्र बांधलेला होता, त्याला मोठे कुलूप लावलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केले आहेत. दरम्यान, काही वर्षापूर्वी श्याम पाटील हे पाडळसरे गाव सोडून कामासाठी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गेला होते.

    त्याठिकाणी शेती, ट्रॅक्टर चालवणे असे काम ते करत होते. तेथेच सपना नावाची तरुणी तिच्या बहिणीकडे राहत होती. दरम्यान, सपना व श्याम यांची ओळख होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला होता. तर, तीन ते चार दिवसांपूर्वी ते बाहेरगावी गेले होते. मात्र, आज अचानक त्यांचे मृतदेह नदेत तरंगताना आढळून आल्याने ही सामूहिक आत्महत्या की नियोजित हत्या, याबाबतच्या चर्चेला उत आला आहे. तर, नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अवैध वाळू साठ्याचा ठपका; मंडळ अधिकारी निलंबित, जळगाव महसूल विभागात खळबळ

    October 9, 2026

    पिंपरुड-सावदा रस्त्यावर तरुणीला बळजबरीने नेल्याची तक्रार; माजी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

    October 9, 2026

    कपडांच्या डिलिव्हरीच्या नावाखाली सायबर फसवणूक; महिलेचे ८७ हजार २१९ रुपये लंपास

    October 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.