Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
    क्राईम

    चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 3, 2026Updated:July 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा | प्रतिनिधी

    जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित कार अडवून तपासणी केली असता आरोपींकडून गावठी कट्टा व मॅगझिनसह इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

    अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे ६० हजारांचा गावठी कट्टा, १० हजारांचे दोन मॅगझिन, ३० हजारांचे तीन मोबाईल आणि सुमारे ५ लाखांची कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडे शस्त्र कुठून आले, त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    चिंचोलीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.