Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॅन्सरग्रस्त होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांना चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत
    जळगाव

    कॅन्सरग्रस्त होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांना चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून होमगार्ड अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे रवींद्र पाटील यांना चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कॅन्सरचे निदान झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी माणुसकीचा आदर्श जपत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

    यावेळी पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी स्वखर्चातून एकत्रितपणे ₹२५ हजारांची आर्थिक मदत उपचारासाठी रवींद्र पाटील यांना सुपूर्द केली.

    रवींद्र पाटील यांनी चोपडा शहरात अनेक वर्षे विविध सण-उत्सव, विशेषतः गणेशोत्सव, विविध मिरवणुका तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या बंदोबस्तात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या निष्ठावान सेवेची दखल घेत पोलीस दलाने संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत माणुसकीचे दर्शन घडवले.

    यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. या मदतीमुळे रवींद्र पाटील यांच्या उपचारांना काही प्रमाणात आर्थिक हातभार लागणार असून पोलीस दलाच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावच्या विकासाला ९०० कोटींची गती; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

    July 7, 2026

    हतनूर धरणाचे २२ दरवाजे १ मीटरने उघडले; तापी नदीकाठच्या गावांना हायअलर्ट

    July 4, 2026

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.