Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरीय गौरव
    राजकारण

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरीय गौरव

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 4, 2026Updated:July 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष सत्कार

    मुंबई | प्रतिनिधी :
    आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी (४ जुलै) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित दिलीपराव निकम यांना प्रतिष्ठेचा ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करून राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रभावी युवा नेतृत्व आणि सहकार चळवळीच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत निकम यांचा सन्मान करण्यात आला.

    या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री रवींद्र चव्हाण, बबनराव (बाबासाहेब) पाटील, उदय सामंत, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, जयकुमार रावल यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना रोहित निकम म्हणाले, “सहकार क्षेत्रात युवा नेता म्हणून केलेल्या कार्याची राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेतलेली दखल माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा सन्मान शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारा आहे.”

    या भव्य सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी रोहित निकम यांनी आयोजकांचे आभार मानत सहकार क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि व्यापक करण्यासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.