Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता गल्लीतीलच संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला होता. मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी ७ डिसेंबर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लग्न लावून मुलांची फसवणूक करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जळगावात ठोकल्या पुढील तपासासाठी त्यांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भडगाव येथील एका युवकाला लग्न लावून देतो म्हणून गोकुळ रविंद्र सोनवणे वय 30 सोनाली गोकुळ सोनार वय 28 रा साकेगाव ता भुसावळ ह मु जळगाव यांनी त्या युवकांना पैसे घेऊन बाहेर गावाच्या मुली बरोबर लग्न लावून दिले लग्न झाल्यानंतर वधू मुलीची बहीण आजारी आहे तिला बघण्यासाठी तुम्हा दोघा नवरा बायको ना जायचे असे सांगून युवकास व त्याच्या पत्नीस लग्नातील दागिन्यांसह भुसावळ येथे बोलविले भुसावळला वधू मुलीला तिच्या नातेवाईकांसोबत रवाना…

Read More

जिल्हाधिकारी अभिजित राऊत : स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिनियमांतर्गत स्थापन तक्रार निवारण समितीकडे महिला तक्रार करू शकतात. या तक्रारींचे निवारण न झाल्यास जिल्हास्तरावर कार्यरत स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये दहा अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय, महमंडळ, कंपनी, दुकाने तसेच खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्त एन के. पाटील यांनी सांगितले, मानव विकास ही संकल्पना जिल्ह्याऐवजी तालुकास्तरावर राबवीत या कार्यक्रमांची व्याप्ती…

Read More

चेन्नई-कुन्नूर वृत्तसंस्था: परिसरातील निलगिरी पर्वत रांगामध्ये सीडीएस बिपीन रावतांचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले. वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह  कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी हा अपघात  झाला.हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यात रावत, रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आएएफ पायलट यांचा समावेश आहे. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील किनगाव खु. येथे १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ७ डिसेंबररोजी घडली तरुणीच्या फिर्यादीयावरून पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. किनगाव येथे पीडित तरुणी आई, वडिल व आजीसह  भाजीपाला विक्रिचा व्यवसाय करतात. 7 रोजी  सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान बाजारात तरुणी भाजीपाला विक्रि करित असतांना किनगावातील ओळख असलेला आरोपी राहुल बाळू पवार ( वय माहित नाही ) हा फिर्यादी तरुणीजवळ आला व तुझा मोबाइल नंबर दे व माझा नंबर घे तसेच तरूणीला लज्जापद होईल असे उद्देशाने असा बोलल्यावर तरुणींने आईला सांगितले आरोपी तिथुन पळून गेला. तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम अंधशाळा चाळीसगाव येथे संपन्न झाला. व्यासपीठावर चाळीसगावचे तहसीलदार श्री.अमोल मोरे साहेब,श्री.के. के.पाटील साहेब(पोलीस निरीक्षक),श्री.नंदकुमार वाळेकर साहेब(गट विकास अधिकारी),श्री.वर्धमान भाऊ धाडीवाल(जनसेवक), मीनाक्षीताई निकम,श्री. कापडणीस साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक)श्री.चौधरी साहेब(समाज कल्याण विभागाचे अधिकारी)श्री. अरुण बापू निकम(सचिव राष्ट्रीय शिक्षण संस्था.)श्री किसनराव जोर्वेकर(संपादक दैनिक सर्वांचा ग्रामस्थ)श्री. रमेश चव्हाण(माजी उपनगराध्यक्ष),नगरसेवक श्री.सुरेश स्वार, श्री.रामचंद जाधव,श्री. दीपक पाटील ,श्री.सोमसिंग राजपूत,डॉ.अनुप पवार,डॉ. हरिष दवे,श्री.योगेश भोकरे श्री.पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः सर्व मान्यवरांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथून जवळ असलेल्या दिपनगर जवळ   काल रात्री प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष यांच्यावर  प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा नोंद केला. दिपनगर नजीक हॉटेल सरगम जवळ महामार्गालगत मंगळवारच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महेश पटेल यांच्यावर हल्ला केला आहे. जखमी पटेल यांना वैद्यकीय उपचारार्थ सुरुवातीला ट्रामा केअर व नंतर साईपुष्प हॉस्पीटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे. विजय कैलास सोनवणे आणि महेश पटेल हे दोघे जण बुलेटने जात असतांना संतोष विश्वनाथ भगत याने दारुच्या नशेत दोघांना अडवले. तुला बघून घेईन तुझ्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत संतोष…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज – सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या झालेल्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सद्यस्थितीत जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीतील ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक स्थगीत करण्यात येत असून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण जागांवरील निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असल्याचे जाहिर केले आहे. त्यात जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीतील ओबीसी वार्ड मधील निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे निर्देश आहेत. तर जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी मंगळवारी ७ डिसेंबर अखेर अर्ज दाखल झाले असून ओबीसी वार्डच्या निवडणूकाच रद्दचे आदेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी जाहिर करण्यात आलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. …

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 231ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते तर 168 अर्जाचे टोकन जमा करण्यात आले होते मात्र या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती अर्ज भरले याचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही असे असले तरी सकाळ पासून बोदवड शहरात वीज गुल होती त्यामुळे उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी धावपळ झाली. बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी साठी आज नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख होती मात्र बोदवड शहरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली ,चार ते साडेचार वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन भरण्यासाठी एकच गर्दी केली होती . अर्ज…

Read More