Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगांव(प्रतिनिधी ) ;-कोल्हे हिल्स परिसरात फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी बोलावून त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा पळवून नेणाऱ्या २ भामट्याना तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केल्याची कारवाई करून कॅमेरा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षकांनी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत कौतुक केले आहे. स्वराज संजय ठाकुर वय १९ रा न्यु लक्ष्मी नगर, अजय राजु चव्हाण वय २० ,रुपेश गणेश साळवे वय १८ दोन्ही रा न्यु लक्ष्मी नगर सावखेडा शिवार अशी तीन आरोपींची नावे आहेत. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्टेशन गु र नं २३२/२०२१ भा दं वि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी सिध्देश कृष्णा महाजन…

Read More

जळगाव ;- जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे येथील भूमिहीन शेतकऱ्याने आमरण उपोषण आरंभिले असून दाखल न घेतल्यास अन्न त्याग आणि जलत्याग करणार असल्याचे शेतकरी अरुण भास्कर पाटील यांनी बोलताना दिली .आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणस्थळी अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले. तसेच कुटुंबियांना इच्छा मरणाची परवानगी राष्ट्रपतींनी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) भाईदास हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी अखेर मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या घोटाळ्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहचले आहे याचा उलगडा होणार आहे. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला.…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाने घोषित केलेला पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ व विविध कार्य गौरव पुरस्कार आणि कवयित्री बहिणाबाई यांचेवरील व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव लक्षात घेऊन मर्यादित संख्येच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उर्वरित व्यक्तींकरिता दूरदृष्य प्रणाली व्दारा (ऑनलाईन पध्दतीने)…

Read More

जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २४ ऑगस्ट पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;-जळगाव जिल्हा, महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज 9 ऑगस्ट क्रांती दीना निमित्ताने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .या वेळी माजीमंत्री गुलाबराव देवकर ,रोहिनीताई खडसे ,जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील , सौ. मंगला पाटील, सौ. मीनाक्षी चौहान. संजय पवार, एजाज मलिक, वालमिक पाटील, नामदेव चौधरी, वाय एस महाजन, स्वप्नील नेमाडे, अशोक लाडवंजारी ,अशोक पाटील, संजय चौहान, सुनील माळी, सलीम इनामदार, मजहर पठाण, मौलाना साबरी, अनिरुद्ध जाधव, अशोक सोनवणे, किरण राजपूत, राहुल टोके, नामदेव पाटील. राजू बाविस्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका स्तरावरून आलेली मदत आज कोकण पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी संपूर्ण साहित्य कोकण वासियांपर्यंत पोहचवून देण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. रविंद्र पाटील यांनी गाडीला झेंडा दाखवत गाडी कोकणसाठी रवाना केली. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, कल्पनाताई पाटील,उमेश नेमाडे, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे , सौ.अर्चनाताई कदम, एजाजभाई मलिक, सलीमभाई इनामदार वाल्मीक मामा पाटील, राजेश पाटील, परेश कोल्हे, राजेंद्र…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) कोरोनाकाळात शरीराला पोषक जीवनसत्व पुरविणाऱ्या पावसाळी रानभाज्या महोत्सवाला मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला असून नागरिकांचा या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . या महोत्सवाला आ. राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजी विक्रेत्यांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरातील आशादीप वसतीगृहातील एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. गणेश कॉलनी येथील आशादीप वसतीगृहात ४० वर्षीय महिला दाखल होती. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास ही महिला कोणाला काही एक न सांगता आशादीप वसतीगृहातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने आशादीप वसतीगृहातील केअर टेकर सुनंदा नंदकिशोर पोतदारयांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी हे करीत आहेत. रंग गोरा, शरीराने सडपातळ, उंची पाच फुट, पाच इंच, अंगात पोपटी रंगाचे ब्लाऊज, टिकल्याची साडी, हातभर बांगड्या, हनुवटीवर…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणी साठी आज ९ ऑगष्ट क्रांतिदिनीं शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. यात बंद केलेली पेन्शन विक्री योजना सुरु करावी, वर्ग ३,४ च्या कर्मचारी वर्गाला कालबद्ध पदोन्नत्या लागू करणे,२००५ नंतर बंद केलेली पेन्शन लागू करणे, आकृती बंद प्रस्तावानुसार नोकर भरती त्वरित करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जळगाव महानगर पालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनाचाही या कामबंद आंदोलनात सहभाग होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर, गुरुनाथ सैंदाणे, प्रफुल्ल पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Read More