राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असे वातावरण तयार करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात एक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केला जात आहेत ते राज्यात कायदा व शिस्त राहिली नाही पोलिसांचे नियंत्रण समाजावर राहिलेले नाही.तसेच आपल्या कडे येणारे लोकप्रतिनिधी हे आपल्या कामासाठी येत नाही ते लोकांची समस्या घेऊन येतात त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशा कानपिचक्या आज राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनीपोलीस मुख्यालय इमारतीचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या घरांचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काढले. जळगाव येथील पोलीस मुख्यालय मारुती व पोलिस इमारतीचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ‘कोविड- 19’ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. चोपडा नगरपरिषदेच्या 64.76कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते तर आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री एकनाथराव खडसे, उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, माजी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून दुसऱ्याला देऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका तरूणीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती असे की, खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवेंद्र चढ्ढा (वय ५०, रा. विशाल कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून २०१६ ते २०१७ दरम्यान दीपाली दीपक भदाणे यांनी चढ्ढा यांच्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली. क्लास मॅनेजमेंट व ओएमआर या सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केली. अशी फिर्याद चढ्ढा यांनी दिली आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते.चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा ट्विटर व फेसबुक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्ट केले. आणि होणाऱ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संजय पाटील सर ठरले गरीब महिलेसाठी देवदुत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव ग्रामीण शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी दोनगाव येथे जळगाव ग्रामीण शिवसेना आणि गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित केले होते. या शिबिरात दोनगाव परिसरातील पाचशे पेक्षा जास्त रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात तपासणी करत असताना सुनंदा नाना कोळी या महिलेची अचानक तब्येत सिरियस झाली असता गोदावरी फाऊंडेशन डॉक्टरांनी ताबडतोब गर्भपिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. संजय पाटील आणि प्रतापराव पाटील यांनी तातडीने शिवसेनेची रुग्णवाहिका बोलुन तिला गोदावरी हाॅस्पिटल मध्ये दाखल करून तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली त्या मुळे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या गाला सारखे आहे तुम्हाला साधा बोदवड चा रस्ता करता आला नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उल्लेख न करता मारला. बोदवड नगरपंचायती मध्ये शाही पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार आला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 18 रोजी सायंकाळी सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे तीस वर्ष राहिलेले आमदार म्हणून एकनाथराव खडसे यांचं नाव न घेता उल्लेख करीत त्यांना चॅलेंज दिले की धरणगावात येऊन बघा हेमामालिनीच्या गाला सारखे रोड नसली तर…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील येथील जीपीएस कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली.कृतीयुक्त शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत जीपीएस ला नावलौकिक प्राप्त झाले आहे. दि 18 रोजी प्राचार्यांच्या कृतीयुक्त शिक्षण ह्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट दिली, प्रसंगी पाळधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशजी बुवा यांचा सत्कार करण्यात आला,…
जळगाव/भुसावळ प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी कोट्यावधी रूपयांची ब्राऊन शुगरसह एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती. आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात अजून काही धागेदोरे उघडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात ब्राऊन शुगर (हेरॉईन)ची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाई करत शनीवार १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धडक कारवाई करत सुमारे १ कोटी रूपये किंमतीचे अर्धा किलो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील 20 रोजी जळगाव येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्था इतर विषयांच्या बैठकीसाठी जळगाव येथे येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे 20 रोजी सकाळी 7:30 वाजेला मुंबई वरून जळगाव ला प्रयाण करतील आठ वाजून पन्नास मिनिटांनी जळगाव येथे आगमन होणार असून 10 वाजेला चोपडा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. 1ते 1.30 अरुण गुजराथी याच्या घरी 1.45 ते 2.15 चोपडा तालुका सूतगिरणी जिनिग व प्रेसिग प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ 2.15मोटारीने जळगांव आगमन 3.15 ते 4 वाजेला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका महिलेकडून 1 कोट्यवधी रुपये किंमत असलेली 500 ग्रॅम ब्राउन शुगर एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रावेर शहरात एक महिला ब्राऊन शुगर घेऊन काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या टीमने रावेर शहरात सापळा रचला. त्यानुसार सकाळी १० वाजेच्य सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो या महिलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली.…

