Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव लक्ष्मण पाटील : स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील गणित शिक्षक सी.एम.भोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर.सोनवणे ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे पर्यवेक्षक जे.एस.पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील गणित विषय शिक्षिका एम.जे.महाजन यांनी रामानुजन यांचा जीवन संघर्ष सांगितला. त्यांच्या भौमितिक रचना, प्रमेय आणि गणितावर असणारे नित्तांत प्रेम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये रांगोळी, रंगभरण, हस्तकला स्पर्धेचे आयोजन केले होते. परीक्षक म्हणून शाळेतील कलाशिक्षक हेमंत माळी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : घरात काम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वृत्त असे की, राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. या दरम्यान त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. यातच त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी देखील केली. या अनुषंगाने पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 17 जागांपैकी 13 जागांसाठी मतदान होणार असून 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आली आहे. तर 13 जागांसाठी साठी 53 उमेदवार रिंगणात असून 26 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.  प्रभाग क्रमांक 11 व 12च्या मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्याठिकाणी तळ ठोकून होते.सकाळी मतदानाला संथ गतीने सुरू होते मात्र दुपार नंतर रांगा लागल्या होत्या तर प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये 6.30 वाजेपर्यंत मतदान झाले  72 टक्के मतदान झालं…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी यांचे नातू वैद्यकीय शिक्षणासाठी नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी  मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 24 रोजी रवाना होणार आहेत परिसरातून त्यांना भावी शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी हरिसिंग झिपरूसिंग राजपुत यांचे नातु व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचे पुतणे तसेच डॉ.विनोद राजपुत यांचे चिरंजीव आहेत यांनी जळगाव येथे १२ सायन्स चे शिक्षण घेतले आहे   पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी रसिया येथील नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये घेणार आहे त्यासाठी  २४ रोजी  मुंबई येथुन विमानाने रवाना होणार आहे.

Read More

1 लाख  68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करणाऱ्याला एलसीबी अटक केली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आजारातून बरे होण्यासाठी जडीबुटीचे औषध देण्याच्या बहाणा करून 3 लाख १३ हजार रुपये घेऊन विवस्त्र फोटो काढून 1 लाख 68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, सुनिल मडकू पाटील (वय-४४) रा. पारोळा जि. जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांनी किरकोळ आजार होता. आजारापासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे एका रस्त्यावर औषधाचा विनापरवाना कॅम्प लावणाऱ्या संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया रा. केसरनगर, भुसावळ…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरी येथून डिझेल घेवून घरी जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. योगेश मराठे (वय-१९) रा. बोरगाव ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहेयाबाबत माहिती अशी की, योगेश मराठे हा तरूण (एमएच १९ डीयू ५३७९) क्रमांकाच्या दुचाकीने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे डिझेल घेण्यासाठी आला होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास डिझेल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळाला धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, गोपनीय विभागाचे मिलिंद…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बस कर्मचाऱ्यांचा संप येत्या दोन दिवसात नही मोडल्यास स्वतः बस स्थानकातून बस बाहेर काढणार असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले. गेल्या दीड महिन्यापासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे शासनाने त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केले असले तरीही शासन विलीनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे अजूनही बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या संपामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे आज सकाळी गारखेडा येथे ॲपे रिक्षा छोटा मिनी ट्रक यात झालेल्या अपघातात तीन जण दगावले. यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की   बस आगरा मध्ये असलेल्या कार्यक्रमात गेलो असता बस कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले असून दोन दिवसात बस पूर्ववत…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : येथे संत गाडगेबाबा ची 65 वि पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी श्री वाघ यांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा याचे विचार मांडले गाडगेबाबानिदिलेल्या दस सूत्री नियमाचे पालन जर केले तर मानवी आयुष्य समृद्ध होईल. यावेळी त्यांनी सावकाराचे कर्ज घेऊ नका, अडाणी राहू नका, एक वेळेस भुके राहा पण मुलबाळ ना शिकवा असे संदेश गाडगेबाबा नि दिले असे वाघ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच कॉग्रेस चे प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक असून त्यानी रंजले गाजले, दिन दुबळे , अपंग अनाथ लोक साठी धर्मशाळा बांधली असे मत व्यक्त केले तर राष्ट्रवादी चे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : येथे आज सकाळी दहा वाजेला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला. आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा चोपडा येथील नवीन पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी नियोजित दौरा होता जळगाव येथून चोपडा रवाना होत असताना धरणगाव येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत हितगुज साधली व कार्यकर्त्यांना पक्ष कार्यासाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, प्रा. एन. डी. पाटील, रवींद्र पाटील, दिपक वाघमारे, मोहन पाटील, अरविंद देवरे, नाटेश्वर पाटील, निलेश…

Read More

त्यांना मंत्री हे बाळासाहेबांनी केले होते – ना गुलाबराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : एकनाथराव खडसे हे मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केली असतील मात्र त्यांना मंत्री हे बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते असा  घनघणाती टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना लगावला. मी माझ्या मतदारसंघात विकास केला आहे बोदवड परिसर सिंचन सारखे योजना माझ्या मतदारसंघात रखडलेले नाही मी आजही धरणगावला वेळेवर पाणी देतोय अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला असून ते मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केले असतील मात्र  त्यांनाही मंत्री हे बाळासाहेबांनी केलं हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात गुलाबराव यांनी घणाघात केला आहे

Read More