Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला
    क्राईम

    प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथून जवळ असलेल्या दिपनगर जवळ   काल रात्री प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष यांच्यावर  प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा नोंद केला.

    दिपनगर नजीक हॉटेल सरगम जवळ महामार्गालगत मंगळवारच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महेश पटेल यांच्यावर हल्ला केला आहे. जखमी पटेल यांना वैद्यकीय उपचारार्थ सुरुवातीला ट्रामा केअर व नंतर साईपुष्प हॉस्पीटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे.

    विजय कैलास सोनवणे आणि महेश पटेल हे दोघे जण बुलेटने जात असतांना संतोष विश्वनाथ भगत याने दारुच्या नशेत दोघांना अडवले. तुला बघून घेईन तुझ्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत संतोष भगत याने महेश पटेल यांच्यावर कोणत्यातरी शस्त्राने हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच पो.नि. विलास शेंडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गु.र.न. 196/21 भा.द.वि. 324, 341, 504, 506, 510, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    June 15, 2026

    देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.