• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक के. के. पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 8, 2021
in चाळीसगाव, सामाजिक
0
दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक के. के. पाटील

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम अंधशाळा चाळीसगाव येथे संपन्न झाला.

व्यासपीठावर चाळीसगावचे तहसीलदार श्री.अमोल मोरे साहेब,श्री.के. के.पाटील साहेब(पोलीस निरीक्षक),श्री.नंदकुमार वाळेकर साहेब(गट विकास अधिकारी),श्री.वर्धमान भाऊ धाडीवाल(जनसेवक), मीनाक्षीताई निकम,श्री. कापडणीस साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक)श्री.चौधरी साहेब(समाज कल्याण विभागाचे अधिकारी)श्री. अरुण बापू निकम(सचिव राष्ट्रीय शिक्षण संस्था.)श्री किसनराव जोर्वेकर(संपादक दैनिक सर्वांचा ग्रामस्थ)श्री. रमेश चव्हाण(माजी उपनगराध्यक्ष),नगरसेवक श्री.सुरेश स्वार, श्री.रामचंद जाधव,श्री. दीपक पाटील ,श्री.सोमसिंग राजपूत,डॉ.अनुप पवार,डॉ. हरिष दवे,श्री.योगेश भोकरे श्री.पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः सर्व मान्यवरांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधव तहसिल कचेरी मध्ये कामानिमित्त आले तर त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल हे स्पष्ट केले.श्री.के.के. पाटील साहेब यांनी वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा देत दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले व अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेला २१ हजार रुपयांचा मदत निधी दिला.श्री.नंदकुमार वाळेकर साहेब यांनी पातोंडा येथील गायकवाड कुटुंबीयांची एका महिन्याच्या आत जी मदत केली त्याबद्दल मीनाक्षीताई निकम यांनी त्यांचे सहृदय आभार मानलेत व साहेबांनी सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांग सुविधा केंद्र उभारून शासकीय योजनेचे सर्व लाभ देण्याचे आश्वस्त केले.श्री. किसनराव जोर्वेकर यांनी विविध शासकीय योजना लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अधिकाऱ्यांना साद घालत लोकप्रतिनिधी यांनी पण दिव्यांग बांधवांसाठी पुढे आले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली.

श्री.अरुण बापू निकम यांनी देव देव्हाऱ्यात नसून माणसात आहे आणि या युगात तो वर्धमान भाऊ यांच्या रूपाने दिसत आहे. असे गौरवोद्गार काढत सभेला संबोधित केले.श्री.सोमसिंग आबा राजपूत यांनी ११००० व श्री.रमेश आबा चव्हाण यांनी ११००० रुपये स्वयं दीप परिवाराला मदत स्वरूपात दिलेत.मीनाक्षीताई निकम यांच्या अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत श्री. वर्धमान भाऊ धाडीवाल यांना दिव्यांग मित्र गौरव सन्मान-२०२१ पुरस्कार देऊन सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.तसेच समाज कल्याण विभाग जळगाव च्या वतीने देखील वर्धमान भाऊ धाडीवाल यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत गेल्या वर्षभरात दिव्यांग बांधवांना सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील १० दिव्यांग मिञांचा सन्मान करण्यात आला.यावेळी दिव्यांग बांधवांना २७ तीन चाकी सायकल,४ व्हील चेअर,८ कुबड्या,७ अंध काठ्या तसेच विधवा महिला यांना ९ शिलाई मशीनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंदीप परिवार सदस्य,वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश पाटील यांनी तर आभार श्री. दिलीप भाऊ घोरपडे यांनी मानलेत.कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Next Post

यावल तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग

Next Post
यावल तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग

यावल तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group