मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेतून तब्बल एक दोन नव्हे तर ४० आमदार एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात बाहेर पडले त्यावर मोठे राजकारण अवघे देशाने पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली. शिवसेनेच्या या बंडावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. तसेच गफलत कुठे झाली याची माहितीही दिली आहे. पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार का फुटले? याची माहिती दिली. आमदार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी बाहेरगावी राहणार्या जागा मालकांना हेरुन त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करीत त्यांच्या जागी बनावट व्यक्ती उभी करुन कमी पैसे घेवून जागा खरेदी करुन देणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अयोध्या नगरात बखळ तीन प्लॉट अनिल राजेंद्र नेहते यांच्या नावावर असून त्या सध्या कामानिमित्त नाशिक येथे राहतात. त्यांचा सुमारे 2 कोटी रुपयांचे प्लॉट राजू जगदेव बोबडे, प्रमोद वसंत पाटील व गंगा नारायण जाधव हे तिघे कमी पैसे घेवून ज्या व्यक्तीच्या नावावर प्लॉट…
जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ.विजय भास्कर जाधव यांनी उधारी मागितल्याच्या कारणावरून ब्रिजलाल सूर्यभान पाटील याने विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, डॉ. विजय जाधव हे गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे सुकळी गावातील काही रुग्णांना तपासून मागील उधारी घेण्याकरिता ब्रिजलाल सूर्यभान पाटील, रा. सुकळी, ता. मुक्ताईनगर यांच्याकडे गेले. त्यावेळी उधारीचे पैसे मागितल्याचा राग येऊन ब्रिजलालने डॉ. जाधव यांना शिवीगाळ करत रागाचे भरात विळ्याने डाव्या गालावर मारहाण केली. यावेळी आनंदा साहेबराव पाटील, सदाशिव कैलास पाटील, सीताराम श्रीराम पाटील अशांनी सदर भांडण सोडवासोडव केली. शिवीगाळ करून…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील सर्वाधिक चर्चेची असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदार संघ होती. आज निवडणुकीचा निकाल रात्री १०.४० वाजेच्या सुमारास जाहीर झाला असून या निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानांपैकी 1 लाख 29 हजार 456 इतकं मतदान पार पडलं होतं. यानंतर आज याची मतमोजणी पार पडली. यामध्ये पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निर्भया पथकाने आज एका परिसरात गस्तीवर असतांना अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पकडून समज देत सोडले आहे, या घटनेची चर्चे जळगावात दिवसभर रंगली होती. शहरातील काही महाविद्यालय आवारात टवाळखोरांकडून उच्छाद मांडला जातो. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची त्यांच्याकडून छेडछाडीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आज सकाळी गस्तीवर असतांना त्यांनी शहरातील जी.एस.ग्राऊडच्या समोरील ‘लव्ह’गल्लीत जात असताच या ठिकाणी अनेक तरूण तरुणी अश्लील चाळे करीत असतांना दिसून आले. यावेळी लागलीच निर्भया पथकातील महिला पोलिसांनी यातील काही मुलीना थांबविले, या मुलीना थांबवून पोलिसांनाच धक्का बसला. अवघ्या…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रेमातून झालेल्या हत्येच्या घटनेत दिवसेदिवस वाढ होत असतांना दिसत आहे. तर गुजरातच्या भरूचमध्ये आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्याचा मुलाची हत्या केली. येथील सोनम सोसायटीमध्ये राहणारा 13 वर्षांचा क-कृष्णा 23 जानेवारीला घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याची आई ममता देवी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती आणि संशय व्यक्त करत तिने सांगितलं की, तिच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. यादरम्यान 31 जानेवारीला अंकलेश्वरमध्ये 13 वर्षाच्या एका मुलगा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह त्याच मुलाचा होता जो काही दिवसांआधी बेपत्ता झाला होता. याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास…
जळगाव : प्रतिनिधी अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित बालकांना शासनातर्फे पोषण आहार दिला जातो. यासाठी शासनाकडून पोषण आहाराच्या धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो. पण, बुधवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे बालकांचे आयुष्य धोक्यात येणार कि नाही असा प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहे. पोषण आहाराच्या धान्यादी मालाच्या तब्बल १४ गोण्या एका गोठ्यात लपवून ठेवण्यात आल्या होता. हा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी समोर आणला. सावखेडा खुर्द येथे सायंकाळी काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एक तरुण हा गावातील एका गोठयाजवळून जात असताना त्याला पोषण आहाराच्या धान्यादी मालाने भरलेल्या चार ते पाच गोण्या दिसून आल्या. हा प्रकार त्याने राष्ट्रवादीचे…
मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल असल्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज २ फेब्रुवारी राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम…
पुणे : वृत्तसंस्था येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विवाहितेला तिच्याच पतीने वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पती विरोधात शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पतीला हैवानच म्हणावे लागेल मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. ३५ वर्षीय पती हा तिला दि २७ जानेवारी २०२२ पासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत आहे. त्याला त्या विवाहितेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करीत तु जर हे कृत्य मला करू दिले नाही तर तुला मारून टाकेल अशी देखील धमकी देत असल्याने विवाहितेने १ फेब्रुवारी २०२३ रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

