जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (आय एम आर आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव च्या संयुक्त तत्वधानांतर्गत आयोजित अक्षरधाम, (बीएपीएस) स्वामीनारायण मंदिर येथील प्रेरक बके स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर व्याख्यान दि. २ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृत केले आहे. अशी माहिती केसी सोसायटी संचलित आय एम आर च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेडाळे यांनी दिली. यावेळी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बैडाळे, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मैनेजमेंटचे डॉ. संजय सुगंधी, कैसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर आदी उपस्थित होते. आदरणीय परमपूज्य…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील निखील उर्फ भोला सुनील अजबे या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीत शहरातील एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या पाठोपाठ आता शहरातील नारायणवाडी भागातील रहिवासी निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय २१) या तरूणावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय-२१ वर्षे रा.नारायणवाडी, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळात ३०० रूपयांच्या मोहापायी भुसावळ तालुक्यातील साकरी येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील साकरी येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी तक्रारदाराला उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. तर संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.या अनुषंगाने आज गायकवाड यांनी खडका येथील तलाठी कार्यालयात तक्रारदाराला बोलावून तीनशे रूपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली आहे.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एसीबीच्या पथकाने त्यांना अटक करून जळगाव येथे नेल्याचे वृत्त होते. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हा सापळा पोलीस…
कोल्हापूर : वृतसंस्था राज्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यातून शिक्षकी पेशाला काळिमा फासला गेला आहे. एका शिक्षकाने तब्बल ७ मुलीना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरकृत्य केल्याची धक्कादायक बाब कोल्हापुरात उघडकीस आली आहे. यावरून पीडित शाळकरी मुलींच्या तक्रारीवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलीसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या असून अधिकचा तपास सुरू केला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याची बाब उघडकीस आल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हापूरमधील पालकांकडून केली जात आहे. . व्ही. पी. बांगडी असं नराधम शिक्षकांचे नाव आहे. या प्रकरणावर पडदा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरवासियांचे मनोरंजन व्हावे आणि आरोग्याच्या दृष्टीने पहाटे उठण्याची सवय लागावी यासाठी जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी काव्यरत्नावली चौकात ‘हॅप्पी स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले होते. जीतो लेडीज विंग आणि युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान काव्यरत्नवली चौकात हॅप्पी स्ट्रीट (आनंदी रस्ता)चे आयोजन करण्यात आले होते. जळगावात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी योगा सत्राने हॅप्पी स्ट्रीटची सुरुवात झाल्यावर झुम्बा डान्सने रंगत वाढवली. विविध प्रकारच्या खेळांचा आनंद लुटल्यावर पौष्टिक खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा सर्वांनी आनंद घेतला. रविवार असून देखील तब्बल २ हजारावर जळगावकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, प्रमोद…
भडगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक तरुण पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या या तरुणासाठी सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून धावत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील १८ वर्षीय तरूण रोहित अशोक मराठे हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला. यावेळी मित्र वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन यांच्यासह दादाभाऊ पाटील,…
पुणे : वृत्तसंस्था शुल्लक कारणाने ३२ वर्षीय विवाहितेची पतीने गळा आवळून खून केला आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले परशुराम जोगण (वय 38) हे भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी रात्री जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे. सविता संदीप औचिते (वय 32) असे गळा आवळून खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण (वय 38) याला अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी…
नागपूर : वृत्तसंस्था नागपुरातील एका मोठ्या कोळसा उद्योजकाकडून केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे नाव वापरुन एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी असल्याचा दावा करणाऱ्या एका भामट्यासह तीन पत्रकारांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशातून चालणाऱ्या एका साप्ताहिकाचे दोन संपादक तसेच त्यांचा नागपुरातील रिपोर्टर हे तिघे नोव्हेंबर 2022 पासून नागपुरातील एका कोळसा व्यापाराच्या विरोधात बातम्या छापून त्याच्यावर खंडणीसाठी दबाव आणत होते. मात्र तरीही कोळसा व्यापारी खंडणी देत नाही, हे पाहून तिघांनी दोन महिन्यांपूर्वी वंश अग्रवाल नावाच्या एका भामट्याला आपल्यासोबत सहभागी करुन घेतले. वंश अग्रवाल हरिद्वारचा राहणारा असून त्याने कोळसा व्यापाऱ्याला…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गुरुकृपा कॉलनीतील २८ वर्षीय महिला आपल्या १२ वर्षीय मुलीसोबत बेपत्ता झाली. महिलेच्या आईने पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. पोलिस महिला व मुलीचा शोध घेत आहेत. ही महिला मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील राहणारी असून सध्या ती गुरुकृपा कॉलनीत राहत होती. या दोघी ५ रोजी कामाला जाते व शाळेत जाते, असे सांगून घरातून बेपत्ता झाल्या. त्या परत आल्या नाहीत. या दोघींचाही नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्या कोठेही न सापडल्याने महिलेच्या आईने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. महिला व मुलगी आढळून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ परिसराती सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडीओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साळूंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी ते आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. तेथून पायी परतताना त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी पोलिस असून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. खुप चोऱ्या होत असून दागिने सांभाळा असे म्हणाला. तेवढ्यात त्या व्यक्तीचा साथीदार दुचाकीवरून आला. त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका…

