धरणगाव : प्रतिनिधीं धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांना नुकताच नोबल पुरस्काराने मराठी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माहेरची साडी फेम अलकाताई कुबल यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम हा जळगाव येथील सूर्या फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, नोबल शाळेचे अध्यक्ष अर्चनाताई सूर्यवंशी, जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पाटील ,जळगाव येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर निलेश चांडक, उद्योगपती शरद कासट, जि प सदस्य प्रतापराव पाटील…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शेतकरी असतात ज्यांच्याकडे मालकीचे कुठलेही पशुधन नसते अशा शेतकरीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी अॅनिमल क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड बनवावे लागते. या कार्डच्या मदतीने पशुपालकांना जनावरे खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कोणत्याही हमीशिवाय 1.60 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. ग्रामीण भागात पशुपालन हे उत्पन्नाचे चांगले साधन बनत आहे. यामुळेच शासन शेतकऱ्यांना हा पशुपालन व्यवसाय स्वीकारण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. याच भागात सरकारने पशु क्रेडिट कार्ड योजनाही सुरू केली होती. या योजनेंतर्गत पशुपालकांना 1.60 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते. हे…
मुंबई : वृत्तसंस्था एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झालेले असल्यास त्याठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी शरद पवार नक्कीच मार्ग काढतील. ते सर्वांचे नेते आहेत. अशी इच्छा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे व्यक्त केली आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरु केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही आवाहन केले आहे. प्रसारमाध्यमांशी…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटासोबत मुंबईहून थेट सुरत पर्यत थेट त्यानंतर पुन्हा ठाकरे गटात वापसी आलेले आमदार देशमुख राज्यभर नव्हे तर देशभर चर्चेत आलेले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आमदार नितीन देशमुख म्हणाले, निलेश राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी अली आहे. आतापर्यंत मुंबईत अनेक लोकांना समुद्रात मारून फेकून दिले. त्याचा पत्ता त्यांच्या नातेवाईकांनाही लागला नाही. तुम्हालाही तसेच मारून समुद्रात फेकून देऊ असे वक्तव्य…
नंदुबार : वृत्तसंस्था बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका मेहुण्याने आपल्याच भावोजीची हत्या केल्याची घटना नंदुबारमध्ये घडली आहे. नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग भावाचा मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली. शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरात ५ फेब्रुवारी शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान घटनेनंतर आरोपी…
औरंगाबाद : वृत्तसंस्था आज कालचे तरुण लग्नापेक्षा जास्त ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणे पसंद करीत आहे. पण यात तरूण असतानाही एका महिलेसोबत रहाणे तरुणाला मोठे घातक ठरले आहे. औरंगाबाद शहराच्या बालाजीनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारा तरुण एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दातील बालाजीनगर भागांत त्याने आत्महत्या केली आहे. मुकेश नागोराव गव्हांदे (वय 30 वर्षे, रा. चौंढी टाकळेश्वर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) असे या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश गव्हांदे हा युवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना युवासेना मोठ्या जोशात ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात संघटीत होत असून नवनियुक्तीहि जाहीर होत आहे. तर नुकतीच युवसेनाच्या तालुका प्रमुख जाहीर करण्यात आले. यामध्ये असोदा येथील अजय सुभाष महाजन तर रामकृष्ण परशुराम काटोले यांची जळगाव तालुका युवासेना तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली. अजय महाजन व रामकृष्ण परशुराम काटोले यांची निवड पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे. तर निवडीबद्दल प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका तरुणाने तू माझ्याशी लग्न कर म्हणत २३ वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तालुक्यातील एका गावात नोव्हेंबर महिन्यात घडला असून शुक्रवारी महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, २३ वर्षीय विवाहिता ही जळगाव तालुक्यातील एका गावात कुटुंबासह वास्तव्यास आहे. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विवाहिता घरासमोर उभी होती. अचानक त्या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून आला. तू माझ्याशी लग्न कर, असे बोलून त्याने विवाहितेचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर विवाहितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. याबाबत तीन महिन्यांनंतर विवाहितेने…
पुणे : वृत्तसंस्था आताच्या युवा पिढीने सोशल मीडियावरील अनोळखी मित्रांपासून सतर्क रहायला हवं. कारण कोण कधी केसाने गळा कापून तुमचा घात करेल काही सांगता येत नाही. डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक होण्याची मोठी शक्यता आहे. आताच्या डिजीटल युगामध्ये साधा एक ओटीपी जरी तुम्ही शेअर केलात तर तुमचं बँक अकाऊंट खाली होऊन जाईल. अशीच एका घटना पुण्यात घडली आहे. सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतलेले जोडपे काही काळात वेगळे होत असलेले आपण पाहत आहोत. शरीर संबंधासाठी खोटी वचने देऊन त्यानंतर फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आपण ऐकले असतील. आधी बळजबरीने विवाह त्यानंतर शरीर संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एक ट्रान्सजेंडर कपल आई-वडील बनणार हे देशातील पहिलीच घटना आहे. हि घटना केरळच्या कोझिकोडमधील घडली असून या दाम्पत्याने आपण पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये एका मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळंत होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. गत 3 वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या जिहाद व जिया पावलने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. जिया पावल एक डांसर आहे. ती पुरुष म्हणून जन्माला आली व एका महिलेत तिचे रुपांतर झाले. तर जहाद एक महिला म्हणून जन्माला आली आणि नंतर ती पुरुष झाली. जहादने गरोदर होण्यासाठी स्वतःची ट्राझिशनिंग प्रोसेस बंद केली आहे. ‘आम्ही आई…

