Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट व्हायरल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. https://twitter.com/satyajeettambe/status/1620966671119974400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1620966671119974400%7Ctwgr%5E08c2240bc1108eb2001e30379510d21a331a3082%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fgraduate-constituency-election-satyajeet-tambe-accidental-death-of-youth-congress-president-manas-pagar-dro95 माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील अर्थसंकल्प नुकताच सादर होवून त्यावर राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत असतानाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील ५० आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. मुंबईमधील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील निकाल लवकरच लागणार असल्याने त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीच कारण अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र पक्षचिन्ह आणि शिवसेना निर्णय अंतीम टप्प्यात असताना उद्याची बैठक महत्वाची असल्याचं…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  भाऊबंद्कीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर आरोपींनी या विद्यार्थिनीला या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी काकाने मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीने मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा काका सोनू जाटव काही महिन्यांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहायला आला होता. त्या काकाने अल्पवयीन अंघोळ करताना तिचा अश्लील फोटो व्हिडीओ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचारीच्या विविध मागण्यासाठी आज दि १ फेब्रुवारी रोजी त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यलय बाहेर आंदोलन सुरु केले आहे. याचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक मोपारी, समाधान बोरसे, समाधान मराठे, इम्रान तडवी, कुणाल पाटील, विशाल विसपुते, यादव महाले, किशोर पाटील, चेतन पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनात म्हटले आहे कि, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील १० ते १२ वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडीत मग्रारोयोची कामे करीत आहोत. वेळोवेळी वरीष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थीत पार पाडत असून मग्रारोहयोची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  केंद्र सरकारकडून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पमध्ये अनेक गोष्टीचा बदल केला आहे. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीबाबत सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर २१ वरून १३ पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील…

Read More

देशाच्या संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थमत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेती व शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असून शेतकर्‍यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवणार आहे येत्या ३ वर्षात १ कोटी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार, यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा आणि संसाधने उपलब्ध करुन देणार पीएम प्रणाम- सेंद्रिय शेतीसाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील रस्त्यावर ६ अनोळखी चोरट्यांनी एका ३६ वर्षीय तरुणाच्या मित्राला मारहाण करीत तब्बल २२ हजार रुपयाचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याने एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील रामदेव बाबा मंदिर सुप्रीम कॉलनीनजीक दि ३१ जानेवारी रोजी कुसुंबा येथील देवेद्र काळे व त्यांचा मित्र शाहीद हे दोघे उभे असतांना एका प्रवासी रिक्षात ४ इसम व इतर दोन असे एकूण सहा जणांनी त्यांचा मित्र शाहीद याला मारहाण करीत त्यांच्याजवळील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १ हजार ८०० रुपये रोकड, तसेच दुचाकीची चावी व त्यांचे महत्वाचे कागदपत्र घेवून फरार झाले, त्यानंतर…

Read More

भोकरदन : वृत्तसंस्था  राज्यात परिवारातील वाद मोठ्या प्रमाणात होत असून यात शेवटचा निर्णय म्हणून फारकत होत असते अशीच एका फारकत झाल्यानंतर न्यायालय परिसरात सुनेने पतीसह सासऱ्याच्या श्रीमुखात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन न्यायालयाच्या आवारात फारकत घेतल्यानंतर सुनेने सासऱ्याच्या व पतीच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे दोन गटात चक्क न्यायालयाच्या आवारातच फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पोखरी येथील युवतीचा विवाह आडगाव भोंबे( ता. भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र त्यांच्यात आपसात पटत नव्हते. त्यामुळे ही विवाहिता माहेरी राहात होती. त्यानंतर नातेवाइकांनी एकत्र येऊन…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील मूळ‎ रहिवासी आणि सध्या मुक्ताईनगर‎ शहरात वास्तव्य असलेल्या २५‎ वर्षीय विवाहितेचा सोशल‎ मीडियावरील ओळखीचा फायदा‎ घेत मलकापूर येथील दोघांनी‎ विनयभंग केला. हा प्रकार ७‎ जानेवारीला मुक्ताईनगर येथे घडला‎ होता. याबाबत महिलेने ३१‎ जानेवारीला मुक्ताईनगर पोलिसांत‎ तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.‎ मुक्ताईनगर येथील पीडित‎ महिला तिचे पती, मुलगा व‎ मुलीसोबत राहते. मलकापूर येथील‎ संशयित करण वानखेडे आणि‎ गणेश इंगळे यांनी सोशल‎ मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून‎ महिलेसोबत ओळख केली. नंतर‎ ओळखीचा गैरफायदा घेऊन‎ मुक्ताईनगर येथे ७ जानेवारीला‎ येऊन व्हिडिओ तयार केला.‎ त्यानंतर विनयभंग केला. महिलेच्या‎ फिर्यादीवरून दोघांविरूद्ध‎ मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल‎ झाला. तपास उमेश महाजन करत‎…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  शुल्लक कारणाने पित्याने आपल्या मुला मारहाण केली असून यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. मुलाच्या आईने आपल्या पतीविरुद्ध याबाबत तक्रार दाखल केली आहे. मिळालेली माहिती अशी  कि, जामनेर तालुक्य्यातील माळपिंप्री येथील वास्तव्यास असलेल्या एका वडिलांना नियमित दारू पिण्याची सवय असून विनाकारण गावातील कार्यक्रमात दारू पिऊन नाचतात. यामुळे बदनामी होते, असे मुलाने वडिलांना सांगितल्याने रागावलेल्या वडिलांनी झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यावर लाकडाने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत जखमी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. मुलाला मारहाण करून जखमी केल्यानंतर संशयिताने पत्नीलादेखील जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सपोनि.दिलीप राठोड करीत आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

Read More