जळगाव : प्रतिनिधी चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातयेणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,उद्योगमंत्री उदयजी सामंत, बंदरे व खणी कर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार असून त्यासाठीची पूर्वतयारी सुरु झाल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ना.गुलाबराव पाटील व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे व निम्न तापी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी आज भोकर येथे नदी परिसरात…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी शहरातून एका परिसरात असलेल्या डॉक्टराच्या घरातून भरदिवसा तब्बल २ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी असलेले डॉ.संकेत कुमार खरे (वय ३१) यांचे दि ३ रोजीच्या भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करीत चोरट्यांनी घराच्या बेडरूम मधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडत घरातील १ लाख रुपयाची रोकड तर १ लाख रुपयाचे वेगवेगळे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आल्यानंतर डॉ.खरे यांनी पारोळा पोलीसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी.गंभीर शिंदे हे करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था त्याच्या परिवाराने धुमधडाक्यात त्याचं लग्न केलं. पण लग्नाचा आणि सुखी संसाराचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती महिलांसारखा मेकअप करतो. अशी एक हैराण करणारी घटना मुंबईमधून समोर आली आहे. इथे एका पत्नीने तिच्या पतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. घाटकोपरला राहणाऱ्या या महिलेने सांगितलं की, 2021 मध्ये कोल्हापूरला राहणाऱ्या एका तरूणासोबत तिचं लग्न झालं होतं. महिलेचा आरोप आहे की, एका रात्री तिने पाहिलं की, तिच्या पतीने नवरीसारखी साडी नेसली, इतकंच नाही तर त्याने नवरीसारखं मेकअप केलं. ही साडी महिलेने लग्नात घेतली होती. रात्री तो तसाच झोपला. दुसऱ्या दिवशी तिने ही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी पाच दरोडेखोरांनी घरात घुसत सदस्यांना चाकूसह लाकडाच्या दांडक्याच्या धाक दाखवित दुचाकीसह 50 हजार रुपयांची रोकड व दहा ग्रॅम सोन्याची चैन घेवून फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने जळगाव शहरात भितीचे वातावरण तापले होते. मिळालेली माहिती अशी की, शहरातील गुड्डू राजा नगर परिसरातील रहिवासी प्रमोद घाडगे हे पत्नी व मुलासह रहायला आहेत. ते आणि त्यांचा मुलगा कुरिअरचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुऱ्हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती, त्यापैकी खालच्या खोलीत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरात हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद झाला होता. यात एका व्यापाऱ्याला दोन जणांनी धमकावले होते. दरम्यान शहर पोलीसांनी धमकावणाऱ्या दोघांवर कारवाई करत शुरवारी ३ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटमधून पायी धिंड काढली. मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये २ फेब्रुवारी गुरुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यापारी त्याचे दुकान उघडत असतांना चाकू दाखवत दमदाटी व धमकावल्याची घटना घडली होती. यामुळे संतप्त व्यापारीधारकांनी दुपारीपासून फुले मार्केट बंद ठेवून निषेध व्यक्त करत महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दमदाटी व धमकावण्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार आलेली नव्हते. शहर पोलिसांत दुपारी…
एरंडोल : प्रतिनिधी धुळ्याकडून येणारी शिवशाही बसने बसस्थानकात वळण घेत असतांना समोरून येणारी दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले असल्याचे समजते. सदर घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास बस स्थानका जवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बस स्थानकाजवळ धुळ्याकडून येणाऱ्या शिवशाही बसणे दुचाकी स्वार साक्री तालुक्यातील दाम्पत्य जळगांव तालुक्यातील आसोदा येथे नातेवाईकांकडे नवसाच्या कार्यक्रमानिमित्त जात होते. धुळे बस आगाराची गाडी एरंडोल आगारात वळण घेत असतांना मोटार सायकलस्वार राकेश हरी बच्छाव (वय 36), योगीता राकेश बच्छाव (वय 28), कार्तिक राकेश बच्छाव (वय 6) आणि भाग्यश्री राकेश बच्छाव (वय 9) बसला धडकल्याने झालेल्या अपघातात कार्तिक राकेश बच्छाव आणि भाग्यश्री राकेश बच्छाव…
चोपडा : प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर ७ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्यासह पथकाने दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या आहेत, यातील ३६ महिलांना जळगाव महिला सुधारगृहात पाठविण्यात आले तर कुंटणखाना चालविणाऱ्या ७ महिलांवर चोपडा शहर…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात वाढत चाललेली असून यावर कुठलाही आळा बसत नाही नुकतीच गंगापूररोड भागात मद्यपान सेवन करण्यास मनाई केल्याने संतप्त पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर चाकू हल्ला केला. स्वप्निल पिंपळे (४० रा.सुयोजीत गार्डन) असे पत्नीवर हल्ला करणा-या संशयित पतीचे नाव आहे. याप्रकरणी याप्रकरणी मानसी पिंपळे यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे यांना मद्यपानाचे सवय असून ते गुरूवारी (दि.२) रात्री दारूच्या नशेत घरी गेल्याने ही घटना घडली. पती दारू पिवून आल्याने या दांम्पत्यात वाद झाला. यावेळी पत्नीने दारूमुळे मुलांवर विपरीत परिणाम होतो असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर…
नागपूर : वृत्तसंस्था अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज वर्धा येथे पहिला दिवस होता. हाच पहिला दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला. मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभामंडपात गोंधळ निर्माण झाला. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात घेतली. एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास उघडी…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील हॉटेल चक्क वेटरने मध्यरात्री फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेले किशोर चौधरी यांच्या मालकीची शहरात हॉटेल चंदन नावाने परमीट रूम व बिअर बार आहे. दि २८ जानेवारी रोजी य हॉटेलमध्ये कार्यरत असलेला वेटर व संशयित आरोपी विजयसिंग शेरसिंग ठाकूर हा दुपारी ४ वाजेपासून तर ३० रोजीच्या सकाळच्या वेळेत हॉटेलच्या खिडकीचे ग्रील तोडत हॉटेलच्या काऊटरमधील ३० हजाराची रोकड लंपास केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.राजेद्र कोळी हे करीत आहेत.

