Author: editor desk

वर्धा : वृत्तसंस्था  स्ट्रॉबेरीसाठी अनुकूल वातावरण, थंडावा, मातीचा कस असल्यामुळे महाराष्ट्राच्या महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. पण, महाबळेश्वरच्या तुलनेत जास्त तापमान असलेल्या विदर्भातील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरी पिकवण्याचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने थंड ठिकाणी पिकणारी स्ट्रॉबेरी पिकविली आहे. शेतकऱ्याच्या या यशस्वी प्रयोगाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या कान्होली कात्री येथील तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. याच स्ट्रॉबेरीचा स्टॉल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दालनात लागला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्टॉलवर पोहचल्यावर त्यांनाही स्ट्राबेरी खाण्याचा मोह आवरला नाही.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  शेतात एखादं चांगलं पीक आलं की, त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्याचबरोबर पण चांगलं पीक आल्यानंतर त्याला मार्केटमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एका शेतकऱ्याने तर चक्क अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविला आहे. उत्पादन खर्च ही निघत नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं शेतकऱ्याने सांगितलं आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्यात पत्ता कोबीचे दर बाजारात घसरले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याचे कारण देत नैराश्यातून अर्धा एकराच्या पत्ता कोबीच्या बागेवर नांगर चालविल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ताकुक्यातील पालान्दूर येथे घड़ली आहे. पालांदूर येथील बागायतदार टीकाराम…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  शहरात अखंड हरीनाम सप्ताह ह.भ.प.गजानन महाराज वरसाळेकर यांच्या काल्याच्या कीर्तन मोठ्या उत्साहात सुरु असतांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. शहरातील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, गटनेते पप्पू भावे, भानुदास विसावे, विजय महाजन, शहरप्रमुख विलास महाजन, पवन महाजन, वाल्मिक पाटील  यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सप्ताहात एकच भक्तीमय वातावरण तयार झालेले असतांना मंत्री पाटील यांनी यंदाच्या सप्ताहासाठी ५१ हजार रुपये दिले तर पुढील वर्षासाठी २ लाख ५१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री पाटील यांनी केली आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तालुकाध्यक्षपदी धरणगाव तालुका महिला बचत गटाच्या प्रमुख पुष्पाताई पाटील यांची विभागीय अध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन,महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा पाटील,तालुकाध्यक्ष संजय पाटील,महिला तालुकाध्यक्ष सरला सोनवणे,अण्णा फुल पगार,वासुदेव वाघ,रवी काबरा आधी बांधवांनी अभिनंदन केले.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या (शिंदे गट) विविध कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये मागासवर्गीय तालुका उपसंघटक पदी संजय पवार यांची निवड तर तालुका उपप्रमुखपदी धरणगाव येथील कॉलनी परिसरातील रहिवासी रवींद्र कडरे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या सत्कार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. रवींद्र कडरे व संजय पवार यांच्या प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यासह व कॉलनी परिसरातील फार मोठा ग्रुप गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबत येणार असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फार मोठा फायदा गुलाबराव पाटील साहेब यांना होणार आहे रवींद्र कडरे यांचे मागासवर्गीय समाजामध्ये चांगले प्रभुत्व असून संजय पवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट पणा केल्याबाबत एका विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी  कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. त्याच गल्लीतील एकाने दि ५ रोजी दुपारच्या सुमारास १० वर्षीय मुलीस पाणी भरण्याच्या बहाण्याने संशयित आरोपींनी आपल्या घरी बोलवून तिच्याशी अंगलटपणा केल्या प्रकरणी त्या संशयित आरोपी विरोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी दीपक जगदाळे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ओव्हरटेक करणाऱ्या ट्रीपलसीट‎ दुचाकीस्वारांना वाचवताना‎ समोरून येणाऱ्या बसची धडक‎ लागल्याने झालेल्या अपघातात‎ दुचाकीवरील दाेन जण जखमी‎ झाले आहे. यातील एक गंभीर‎ असून, त्याला खासगी रुग्णालयात‎ दाखल केले आहे. दुसऱ्या‎ जखमीवर जीएमसी रुग्णालयात‎ उपचार सुरू आहेत. हा अपघात‎ रविवारी सकाळी १०.४५ वा. टीव्ही‎ टाॅवरजवळ घडला.‎ पाळधी येथे मित्राच्या लग्नासाठी‎ नाडगाव (ता. बोदवड) येथील‎ कडू बाविस्कर (वय २७), भुरा‎ बाळू राजपूत व अन्य एक जण‎ माेटारसायकलने (क्र. एमएच १२-‎ जीक्यू ५४७) रविवारी सकाळी‎ निघाले. कडू हा दुचाकी चालवत‎ हाेता. टीव्ही टॉवरजवळ आेव्हरटेक‎ करताना जळगावहून भुसावळकडे‎ जाणारी भरधाव बस (क्र. एमएच‎ १४ बीटी ००९८) समाेर आली.‎ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात‎ बस…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिमांविरोधात केलेलं वादग्रस्त विधान त्यांना भोवलं आहे. राजस्थानातील बारमेर इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी २ फेब्रुवारी रोजी हे विधान केलं होतं. याप्रकरणी रामदेव यांच्याविरोधात काल गुन्हा दाखल झाला होता. राजस्थानातील चौहाटन पोलीस ठाण्यात १५३ अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधील काही लोकांना संपूर्ण जगाला त्यांच्या धर्मात घेण्याचं वेड लागलं आहे. पण हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगलं वागण्यास शिकवतो. मुस्लिम लोक दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात त्यानंतर त्यांना पाहिजे ते करतात.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गेंदालाल मिल परिसरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील भरवस्तीत असलेल्या गेंदालाल मिल परिसरातील बिल्डींग न.१७ रूम न.३० हे रंजना अशोक ठाकूर (वय ३४) यांच्या आईचे घर असून दि ४ शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी मागच्या दरवाजाच्या बंद दरवाजा तोडून घरात बेकायदेशीररित्या प्रवेश करीत घरफोडी केली. या घरफोडीमध्ये १६ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरी झाली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.भास्कर ठाकरे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मेहरूण ट्रकवर १९ वर्षीय तरुणास भरदिवसा चाकूचा धाक दाखवीत लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जोशी पेठ परिसरातील रहिवासी संकेत सुनील माळी (वय १९) हा शनिवार दि ४ रोजी दुपारच्या सुमारास मेहरूण ट्रकवर आपल्या दुचाकीवर बसलेला असताना त्याच्या जवळ दोन अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवर येत त्याला चाकुचा धाक दाखवीत गळ्यातील सोन्याची चैन व कानातील सोन्याची बाळी असा एकूण ४२ हजार रुपयांचे ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संकेत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More