जळगाव : प्रतिनिधी भडगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने परिसरातून बेड्या ठोकल्या. विजय दशरथ पाटील (२५, रा. यशवंत नगर, भडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी भडगाव बसस्थानक बलात्कारातील संशयित आरोपी विजय पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो भडगाव बसस्थानक परिसरामध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. यांनी केली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाने पोह लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला नुकतीच गर्भधारणेची घोषणा केली होती. आज बुधवारी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात बाळ झाले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना आहे. “सकाळी 9.30 च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला,” असे ट्रान्स जोडप्यापैकी एक झिया पावल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे झियाने पुढे सांगितले. तथापि, ट्रान्स व्यक्तीने नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला आणि सांगितले की, ते आत्ताच सार्वजनिक करू इच्छित नाहीत. झिया पावलने अलीकडेच इंस्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याचे जाहीर केले होते. पोस्टमध्ये म्हटले होते की, “आम्ही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील नुकतेच लग्न झाल्यावर नवरी फरार होण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये नव्या नवरीने एक खतरनाक कारनामा केला आहे. लग्न करून मरूधर एक्सप्रेसने सासरी जात असलेल्या नवरीने रेल्वेतच सासरच्या लोकांना विष दिलं आणि संधी बघून फरार झाली. घटनेनंतर सासरच्या लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या सगळ्यांची स्थिती चांगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असं सांगण्यात आलं की, त्यांच्यासोबत असलेल्या नवरीने सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. मीडिया रिपोर्टनुसार, मरूधर एक्सप्रेसने…
मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. १४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व…
जळगाव : प्रतिनिधी खान्देशातील केळीची नेहमीच देशभरात मागणी असते. पण जळगाव जिल्ह्याच्या केळीला उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 50 ते 60 रुपये प्रति डझन केळीला भाऊ देऊनही चांगल्या दर्जाची केळी ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करीत आहे. सद्यस्थितीत कमी दर्जाच्या केळीला तीस ते चाळीस रुपये प्रती डझन विक्रमी भाव मिळत असून केळी उत्पादनात घट झाल्याने मात्र केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्वाधिक केळी उत्पन्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातच सध्या बाजारपेठेत ग्राहकांना केळी मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत असून 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊनही ग्राहकांना केळी मिळत नसल्याने केळी…
औरंगाबाद : वृत्तसंस्था युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता. मिरवणूकीवेळी डीजे बंद करायला सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता.तसेच काही प्रमाणात गाड्यांच्या…
जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डेच्या दिवशी प्रेमी एकमेकांशी आपल्या हृदयातील गोष्टी बोलतात. हा दरवर्षी फक्त 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रपोज डे ला खूप महत्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या मनातील भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर मनमोकळेपणाने बोलू शकाल. प्रपोज डे का साजरा करतात? प्रपोज डे साजरा करण्यामागे कोणतीही ऐतिहासिक कथा नाही. वर्षानुवर्षे पाश्चिमात्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने नवीन रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत आणि ट्रेड्समन मेट आणि फायरमन पदांसह गट ‘सी’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ट्रेडसमन मेट पदासाठी १२४९ आणि फायरमन पदासाठी ५४४ रिक्त पदांसह एकूण १७९३ पदे रिक्त आहेत. सर्व अर्जांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण तारीख ही अर्जाची शेवटची तारीख असेल, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवस. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट/वेब पोर्टलवर अर्ज करू शकतात. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स रिक्रूटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स खाली नमूद केलेल्या विविध क्षेत्रात ट्रेड्समन मेट आणि फायरमन पदासाठी अर्ज मागवत आहे: 1. पूर्व…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचखेडे बुद्रुक येथे सोमवारी दुपारच्या सुमारास महिलेच्या झालेल्या हत्ये प्रकरणी पोलीसांनी संशयीत तरुणास मध्यरात्री अटक केली आहे. पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन विशाल नाना साबळे ( २३, चिंचखेडे बुद्रुक) याला आज अटक केली. मिळालेली माहिती अशी कि, चिंचखेडे बुद्रुक येथील घरात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळताच ते तातडीने सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. घरातील स्वयंपाक गृहाजवळ महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्यावर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तीचा मृत्यु झाल्याचा पोलीसांना कयास आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी चारचे सुमारास झाला असावा, असे पोलीसांनी सांगितले.
जळगाव : प्रतिनिधी बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरील महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दीपक सुरेश नन्नवरे (२०, रा. बांभोरी ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या अपघात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दीपक नन्नवरे हा आईवडील आणि भावांसोबत बांभोरी येथे वास्तव्याला होता. मजुरी काम करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. मंगळवारी सायंकाळी जळगावातील काम आटोपून दीपक हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत बांभोरी येथे दुचाकीने येत होता. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात…

