जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटात जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश करीत आहे, तर जिल्ह्यात शिंदे गटाचे बळ अधिक वाढत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. आज हि जांभोरे गावातील तरुणांनी प्रवेश केला आहे. जांभोरे गावातील तरुणांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये अतुल जिजाबराव पाटील, विजय विलास कोळी, विशाल गोविंदा गुजर, अमोल पितांबर हटकर, वैभव राजेंद्र पवार, महेश दीपक हटकर, गणेश देवा गवळी, अजय शरद कोळी, या सोबत युवासेना विभाग प्रमुख शुभम चौहान, व जांभोरे शाखाप्रमुख अमोल सोनवणे यांचा समावेश आहे. तर मंत्री पाटील यांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काही महिन्यांपूर्वीच एम. राज कुमार यांनी पदभार स्वीकारनारे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांची पदोन्नती झाली आहे. पुढील नियमीत बदली गॅजेटमध्ये त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्णी लागणार आहे. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आज मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे देखील पदोन्नतीसाठी पात्र झाले असून पुढील नियमीत बदली प्रक्रियेत त्यांची वर्णी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून लागणार आहे.
तरुणांना सुवर्ण सरकारी नोकरी येत आहे, BSF कॉन्स्टेबलच्या 1410 जागा भरल्या जाणार आहेत. BSF कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2023 अंतर्गत, सीमा सुरक्षा दलाकडून विविध प्रकारच्या ट्रेडमधील 1410 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. तुम्हालाही बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी खालील प्रकारची पात्रता ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकाल, या लेखात या भरतीशी संबंधित सर्व माहिती संपूर्ण तपशीलवार देण्यात आली आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचून, तुम्हाला या भरतीशी संबंधित सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने मिळू शकेल आणि तुम्हाला पुढील अर्ज करण्याची प्रक्रिया देखील कळेल. BSF…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था Hyundai Creta असून सध्या देशातील सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. आतापर्यंत या एसयूव्हीच्या 8.3 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. जानेवारी २०२३ हा Hyundai Creta साठी देखील सर्वोत्तम महिना आहे. गेल्या महिन्यात 15 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. मात्र, लवकरच Hyundai Creta साठी अडचणी वाढणार आहेत. दोन नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत येत आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया 2023 किआ सेल्टोस फेसलिफ्ट: सेल्टोस ही सध्या देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. Hyundai Creta ला या SUV मधून खरी स्पर्धा मिळत आहे. 2019 मध्ये लॉन्च झाल्यापासून ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार…
आजपासून जगभर व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होत आहे आणि १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने होते. या दिवशी लोकं आपल्या प्रियकर प्रियसीला रोझ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. असंख्य जोडपी वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. रोझ डेच्या काही दिवस आधी बाजारात लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा असे अनेक रंगाचे गुलाब बाजारात उपलब्ध होत आहेत. रोझ डे हा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रोझ डे का साजरा केला जातो आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुलाबाचं प्रेमसंबंधाशी…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील मारवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ६ रोजी अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या घरातून काही तरी फूस लावीत तिला पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.
औरंगाबाद : वृत्तसंस्था आईनेच पोटच्या मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईने झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.औरंगाबादमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुलांची आई मनोरुग्ण असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरामध्ये दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ घरी झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकावर एका महिलेच्या पर्स मधील २६ हजार रुपयांचे दागिन्यासह रोकड लंपास झाल्याची घटना उघडकीस आल्याने अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिरूड परिसरातील रहिवासी असलेल्या जयश्री निलेश सूर्यवंशी हे दि ६ रोजी कल्याण – रावेर बसने अमळनेर शहरातील बस स्थानकावर दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास आले असता ते अमळनेर येथे उतरत असतांना त्यांनी त्यांची पर्सची पाहणी केली असतात पर्समध्ये ठेवलेला २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस व ५०० रुपये रोकड अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस येताच त्यांनी तत्काळ अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील खळ्यातील गोडावून चोरट्यांनी फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील बोरगाव गावात गजानन रविद्र चव्हाण यांच्या मालकीचे खळ्यात गोडावून आहे. या गोडावूनमध्ये टॅक्टर बटरी व टॅक्टरचे साहित्य वेडिंग मशीन यासह त्यांच्या उपयोगातील मशीन होती. दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेनंतर अनोळखी चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोणत्याही विवाहात प्रत्येक नवरीला आपल्या सासरी जायचे असते पण पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात एका नवरीला मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ती गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली होती. रावळपिंडीमध्ये रविवारी लग्न सुरू असताना एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. हा तरूण न बोलवता लग्नात घुसला होता. इथे नवरीच्या लग्नाचे रिवाज सुरू होते, तेव्हाच त्याने तिच्यावर गोळी झाडली. पाहुण्यांनी या हल्ला करणाऱ्या तरूणाला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यादरम्यान जखमी नवरीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरूणाला लग्न होत असलेल्या तरूणीसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीच्या परिवाराने त्याला लग्नास नकार दिला…

