जळगाव : प्रतिनिधी राज्य व केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आज जिल्ह्यातील ५५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून यासाठी तब्बल ५७ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीप्रमाणेच मंत्रीपदाच्या आपल्या दुसर्या टप्प्यात या योजनेला प्रचंड गती दिली आहे. या योजनेचा पहिला टप्पा जिल्ह्यात अतिशय यशस्वीपणे पार पडला असून दुसरा टप्पादेखील याच तडफेने १००% यशस्वी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निमखेडी शिवारातील एका अपार्तमेंट मधील घरातून चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांची सोने चांदीच्या दागिने घेवून पोबारा केल्याची घटना दि १४ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील निमखेडी शिवारातील हिरा गौरी पार्क येथील के.हाईट अप्पार्त्मेंत मधील ६ नंबर घर बंद पाहून चोरट्यांनी घराचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरामधील बेडरूममधील कपाटातून ८१ हजार किमतीची ४५ ग्राम वजनाची मंगलपोत, ३६ हजाराची सोन्याची चैन, ५,४०० रुपयांचे सोन्याचे कानातील टोप्स, १२ हजार ६०० रुपये किमतीचे ७ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टोगल, ९ हजार रुपये किमतीचे ५ ग्राम…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानाचा असा जय गणराया पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. उत्कृष्ट आरास व शिष्टबद्ध विसर्जन मिरवणूकीसाठी उपरोक्त पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षीचा उत्कृष्ट आराससाठी जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा मानाचे तृतीय पारीतोषीक जय गणराया पुरस्कार 2022 युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांना देण्यात आला. सदर पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, सहा.पोलीस अधिक्षक (गृह) संदिप गावित, यांच्या शुभहस्ते तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत…
पंढरपूर : वृत्तसंस्था आतापर्यंत आपण पाहिले असेल बुलेट, बाहुबली थाळीनंतर आता 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळी खवय्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे. राज्यामध्ये बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या. यानंतर आता पंढरपूर- सांगोला रस्त्यावर 40 गद्दार थाळी आणि 50 खोक्के एकदम ओके थाळी प्रवाश्यांसह, पंढरपूर वासियांचे लक्ष वेधून घेत आहे. मार्केटिंगसाठी कायपण हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. अशीच एक भन्नाट कल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मार्केटमध्ये आणली आहे. पंढरपुरातील हॉटेलमध्ये त्यांच्याकडून 40 आणि 50 रुपयांना थाली देण्यात येत आहे या थालीचे नाव 40 गद्दार आणि 50 खोके असे देण्यात आल्याने महाराष्ट्रभर तिची चर्चा सुरू आहे. राज्यात…
मुंबई : वृत्तसंस्था फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात असणारी कंपनी गुजरातमध्ये का गेली? असे अनेक सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर घणघणात केला आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात असणारी कंपनी गुजरातमध्ये का गेली? असे अनेक सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर घणघणात केला आहे. एका महिन्यात असं काय घडलं की हा प्रकल्प गुजरातला गेला. एवढी मोठी गुंतवणुक महाराष्ट्रा बाहेर का गेली. असे सवाल उपस्थित करत आपलं सरकार हे खोकं सरकार आहे.…
आपण सर्वजण आपल्या लहानपणापासून दूध पिण्याचे फायदे ऐकत आलो आहोत. दूध पिणे हे आरोग्यासाठी पोषक असते. मात्र दुधात काही खास गोष्टी मिसळल्याने त्याचे पौष्टिक मूल्य दुप्पट होते, हे तुम्हाला माहिती आहे का?, असाच एक महत्वाचा घटक म्हणजे सुकलेलं आलं म्हणजेच त्याला आपण सुंठ म्हणतो. सर्दी किंवा खोकला अशा आजारांवर सुंठ औषध म्हणून वापरले जाते. मात्र तुम्ही दुधात सुंठ मिसळून पिण्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया… प्रतिकारशक्ती वाढवा दुधात सुंठ टाकून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सुंठ म्हणजे सुकवलेले आले असते. हे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. यासाठी कोमट दुधात सुंठ टाकून पिऊ शकता. सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आक्रमक पवित्रा घेत, बकालेंना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणीच अजित पवारांनी केली. वक्तव्य खपवून घेणार नाही अजित पवार म्हणाले, राज्यातील कोणत्याही समाजाबद्दल कुणीही काहीही आक्षेपार्ह बोलण्याची आवश्यकताच नाही. बकालेने मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे, ते खपवून घेणार नाही. त्याच्या 10 पिढ्याला आठवण झाली पाहीजे, असं काहीतरी केलं पाहिजे. बकालेला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. बकाले पोलिस अधिकारी असला म्हणून काय झालं. त्याला काय शिंग आलीयेत का? की मस्ती आलीये? हा शिवाजी महाराज…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समस्या निवारणासाठी सर्वच पातळ्यांवर आलेली मरगळ झटकून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महापौर जयश्रीताई महाजन, मनपा आयुक्त विद्यामैम गायकवाड, माजी महापौर भारतीताई सोनवणे, सिमाताई भोळे या आज एकत्र आल्या. शहरातील महामार्गावरील खड्डे, रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील अर्धवट रस्ते या विषयावर डायमंड गृपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मान्यवर महिलांनी शिवकॉलनीजवळ महामार्गावर तयार झालेल्या महाकाय खड्ड्याची पाहणी करून त्याची मोजणी केली. शिवकॉलनीजवळच्या खड्ड्याची खोली अडीच फूट आणि डांबराचा डिव्हायडरवर चढलेला थर पाहून महापौर महाजन व आयुक्त गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथूनच एनएचआयचे प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांना चर्चेसाठी या म्हणून सुनावले. आजच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तरुणांनी वेदांतावरून पेटून उठलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली सरकार जनतेला गाजर दाखवत आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात तर मग उठतात कधी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वसंतवाडी येथे दिनांक १४सप्टेंबर बुधवारी पोषण माह निमित्ताने वसंतवाडी अंगणवाडी कोड नंबर १०१८/१०१९ यांनी विविध कार्यक्रम आयोजन केले होते यात स्वस्थ बालक स्पर्धा,पारंपरिक पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील होते. तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांचीही विशेष उपस्थिती होती त्याच बरोबर जळगाव पं.स.सदस्या सौ.निर्मला कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण सर, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी ( प्रभारी )भोई मॅडम, जळगाव तालुकाआत्मा समीतीचे अध्यक्ष पि.के.पाटील, तालुका आत्मा समीती सदस्या सौ.निर्मला चव्हाण,हे.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रभाऊ कापडणेकर ,जिल्हा एकलव्य…

