Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्कजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुसर्‍या तरूणाही बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश विसपुते (30, रा.कांचन नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, अपघातातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील के.सी.पार्कजवळ मंगळवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) याचा जागीच मृत्यू झाला होता. यातील समाधान बाविस्कर (रा.आमोदा खुर्द) जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपुते (रा.कांचन नगर, जळगाव) असे तिघेजण गंभीर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द या ठिकाणच्या एका तरुणाला एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणाचा घराच्या छतावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता हि घटना घडली आहे. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द येथील अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुशची आजी सकाळी त्याला उठवायला गेली असता हि घटना समोर आली आहे. गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश खाली पडला. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावातील अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत राहत…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  कसबा येथील पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने एवढा प्रचार करूनही त्याचा फायदा भाजपचे हेमंत रासने यांना झाला नाही मात्र काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील हे “Who is Dhangekar?” मी बऱ्याच दिवसांपासून धंगेकरांचं नाव ऐकतोय.. पण हा धंगेकर कोण आहे” असं ते भर सभेत म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाल्याने आता चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केलं जात आहे. https://twitter.com/psambhajisakal/status/1631210767986073600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1631210767986073600%7Ctwgr%5E5807f75342f664e36c155dbca6dd36555ccda318%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fbjp-chandrakant-patil-who-is-dhangekar-congress-video-viral-drl98 भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जगात प्रत्येक धर्माची वेगवेगळी आणि प्रत्येक कोपऱ्यातील लोकांच्या स्वतःच्या परंपरा आणि चालीरीती आहेत. काही प्रथा सामान्य असतात, तर काही अशा असतात की त्या ऐकूनच आपण थक्क होतो. अशा परंपरांचं पालन करताना तुम्ही अनेकदा फक्त महिलांनाच पाहिलं असेल. उदाहरणार्थ, आफ्रिकन जमातींमध्ये, स्त्रियांना पुरुषांकडून मारहाण करून घ्यावी लागते आणि कपडे न घालण्याची प्रथा असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला जी प्रथा सांगणार आहोत ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा परंपरा केवळ दूरवरच्या आदिवासींमध्येच नाही तर आपल्या देशातही आढळतात, ज्या महिलांच्या दृष्टिकोनातून खूप विचित्र आहेत. स्त्रियांचे हक्क आणि समानतेबद्दल खूप बोललं जातं. आपल्या देशात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. खरंतर कसबा पेठ निवडणूक दोन्ही पक्षांसाठी रंगीत प्रतिष्ठेची झाली होती. कसबा हा भाजपला बालेकिल्ला समजला जात असला तरी पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसब्यात ठाण मांडून होते. रात्री-अपरात्री त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  प्रियकरासोबतच्या नात्यात अडसर ठरत असलेल्या लहान बहिणीची मोठ्या बहिणीने हत्या केली. तिने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. दोघांनीही पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांपासून ते फार काळ लपून राहू शकलं नाही. पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली. हि घटना मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना साईखेडा येथील आहे. साईखेडा पोलिसांना हॉस्पिटलमधून सूचना मिळाली की, एका तरूणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. पोलीस लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तरूणीला तिची बहीण आणि आई हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणी बाथरूममध्ये पडून मरण पावली. पण घटना संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील महत्वाची मानली जाणारी पुण्यातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे आज त्यांचा निकाल सुरु झालेला असून यात आता कसबा पेठ निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत रासने यांची आघाडी मोडीत निघाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सातव्या फेरीमध्ये ४ हजार २७० मतं घेतली. कसब्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरु केला आहे. कसब्यामध्ये सध्या तरी सर्व अनिश्चित दिसून येत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले रवींद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली आहे. धंगेकर हे सहाव्या फेरीअखेर ३…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातून जवळ असलेल्या एका गावातील ३० वर्षीय तरुणाने युट्यूब वरून पाहून घरात भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या संशयताला पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून अटक केली आहे. कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव (वय-३०) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाल्यानंतर यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे पोना.महेश महाले, रविद्र मोतीराया, निलेश पाटील, सुहास पाटील, राहुल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरुच आहे. जळगाव शहराजवळ असलेले आव्हाणे भागात बुधवारी दुपारी २ वाजता वाळू भरण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरने आव्हाणे रस्त्यालगत असलेल्या काळभैरव मंदिराजवळ दुचाकीवर आव्हाण्याहून जळगावकडे जात असलेल्या माय-लेकाला उडविल्याची घटना घडली. यामध्ये मुलाला जबर मार बसला असून, आईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ट्रॅक्टरची तोडफोड करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून तुफान वाळू उपसा सुरु आहे. पोलिस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसून, वाळू माफियांना जणू मोकळे रानच करून दिले आहे. त्यातच वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर देखील मोठ्या भरधाव वेगाने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील उस्मानियों पार्क येथील विवाहितेने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सना तौसिफ मिस्तरी (वय २१, रा. उस्मानियाँ पार्क, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सना तौसिफ मिस्तरी ही विवाहिता पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला होती. गेल्या दोन महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होता. घरात होत असलेल्या कौटुंबिक वादासंदर्भात विवाहितेने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच सनाचे आपल्या आई- वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. मंगळवारी मध्यरात्री सर्व जण झोपलेले…

Read More