नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संघर्षावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. या सत्तासंघर्षावरील सुनावणी याचं आठवड्यात संपणार असल्याची माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी संवाल साधला. राहुल शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने जो शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते आता संजय राऊत आहे. मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार आता शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचं पत्र दिल्याची माहिती शेवाळे यांनी दिली. राज्यसभेत तुमचे तीन…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन महिन्यापासून सोने व चांदीच्या भावात मोठी दरवाढ तर घसरण होत असतांना दिसून आली पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी याच भावाची मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं खरेदी करणाऱ्या मुली, महिला आणि लग्नाच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर खाली घसरले आहेत. GST आणि RTGS वगळून 10 ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास 55,7000 रुपये झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर आज 55,712 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,957 रुपयांवर बंद झाली होती. आज चांदीच्या किंमतीत मोठी…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय मुलीचा सोमवारी नियोजित हळदीचा कार्यक्रम होता यासाठी वर पक्षातील काही नातेवाईक मुलीला घेण्यासाठी वधूच्या घरी आले असता. हळद लागण्याच्या वेळी हळद लागणार होती. मात्र सायंकाळी हळद लावण्याच्या वेळेसच तिची आई-वडिलांच्या घरूनच अंत्ययात्रा निघण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. तिच्या हातावरील मेहेंदी विवाहापूर्वीच क्रूर काळाने पुसून टाकली. एरंडोल तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवतीचा विवाह मंगळवारी होणार होता. त्यामुळे घरामध्ये लगीनघाई व आनंदाचे वातावरण होते. सोमवारी तिला वरपक्षाकडील पाहुणे घेण्याकरिता सोमवारी सायंकाळी तिला हळद लागणार होती. त्याआधीच सकाळी ११ वाजेच्या सुमारास या नियोजित वधूने शेतातील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकारामुळे तिच्या आईवडिलांसह…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील महाराणा प्रताप रोडवरील पंचवृक्ष चौकालगत रविवारी रात्री घरफोडी झाली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ज्या घरात चोरी केली, त्याच घरात आधी चहा केला, तो प्यायल्यावर मग चोरी केल्याचे समोर आले आहे. मिळालेली माहिती अशी कि, मंगळवारी पंचवृक्ष चौकात राहणाऱ्या पंढरीनाथ किसन धोबी यांच्या घरी चोरी झाल्याचे सोमवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आले. पंढरीनाथ धोबी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दि. २६ च्या मध्यरात्रीनंतर सुमारे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडुन दहा हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व १२ हजार रूपये रोख असा सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील नदी पात्राच्या किनाऱ्यावरून वाळू चोरीची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाळू चोरी करण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या तूरखेडा गावाकडे जाणाऱ्या कच्यारोडवर एका स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रोलीमध्ये संशयित आरोपींनी १ ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी दि २७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ३ लाख रुपये किमतीचे व ३ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा माल ताब्यात घेतला असून या प्रकरणी संशयित आरोपी किरण साळुके(वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
धुळे : वृत्तसंस्था भारतीय सैन्यभरती (अग्निवीर एन्ट्री) २०२३-२४ साठी पात्र पुरुष उमेदवारांसाठी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही अधिसूचना www.joinindianarmy.nic या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन नोंदणी १५ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती संचालक (भरती) कर्नल विक्रम सिंग यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. भरती वर्ष २०२३-२४ साठी अग्निवीरांची भरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. टप्पा एक (ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा) आणि दुसरा टप्पा (भरती रॅली) याप्रमाणे राहील. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर किपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (दहावी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन (आठवी पास) या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. ही…
हैदराबाद : वृत्तसंस्था येथील एका २२ वर्षीय युवकाने आपल्या मित्राची गळा दाबून हत्या केली. हा मित्र युवकाच्या प्रेयसीला सातत्याने मेसेज व काॅल करत होता. युवकाने मित्राचे शिर धडावेगळे केले, तसेच हृदय व गुप्तांग, बोटे कापून काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तो पोलिस ठाण्यामध्ये स्वत:हून हजर झाला व मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी युवकाचे नाव हरिहर कृष्णा असून त्याने आपला मित्र नवीन दिलसुखची हत्या केली. हे दोघे जण व हरिहरची प्रेयसी एकाच महाविद्यालयात शिकत होते. हरिहर, नवीन एकाच मुलीवर प्रेम करत होते. मात्र, नवीनने आपल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (यूपी बोर्ड) इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी विविध परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देत आहेत. पण बरेलीतील एका परीक्षा केंद्रावर चक्क एक माजी आमदार इयत्ता १२ वीची परीक्षा देण्यासाठी पोहोचला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लॅमिनेशन केलेलं हॉल तिकीट, पाण्याची बॉटल आणि रायटिंग पॅड घेऊन ५१ वर्षीय एक व्यक्ती इयत्ता १२ वीच्या परीक्षेला पोहोचला. या व्यक्तीनं परीक्षा केंद्रावरील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. कारण ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून विभागातील माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल होते. राजेश मिश्रा हे भाजपाचे माजी…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील उत्राण येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ रोजी घातक शस्त्र बाळगणा-यास अटक केली आहे. भिकन रमेश कोळी (रा. ता.एरंडोल जिल्हा जळगाव) असे तलवारीसह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावी भिकन रमेश कोळी हा अवैधरित्या तलवार घेवून तलवारीच्या बळावर दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोकॉ. इश्वर पाटील, मोतीलाल चौधरी आदींना तपासकामी रवाना केले होते. तपास पथकाने उत्राण या गावातील जी.के.फिटनेस क्लब येथून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २४ वर्षीय तरुणाच्या पत्नीचे फोटो एकाने सोशल मिडीयावर वापर करीत पत्नीच्या भावाला मेसेज केल्याने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात २४ वर्षीय तरूण आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. दि २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी इन्स्टाग्राम धारकाने आपली ओळख लपवित २४ वर्षीय तरुणाच्या पत्नीच्या फोटोचा वापर करीत त्या खात्याद्वारे पत्नीच्या भावाला शिवीगाळ करीत धमकी दिल्या प्रकरणी तरुणाने सायबर पोलिसात धाव घेत अनोळखी इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.

