Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्याचा मोदी सरकार पुरस्कार देतेय ; राऊत आक्रमक !
    राजकारण

    कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्याचा मोदी सरकार पुरस्कार देतेय ; राऊत आक्रमक !

    editor deskBy editor deskJanuary 28, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांचा सन्मान व्हावा, यासाठी हे सरकार काय करतंय, हेदेखील पाहावे लागेल. दुसरीकडे कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंहांचा मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. मात्र,मोदी सरकारला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर पडला, अशी टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

    आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंग यादव यांनी कारसेवकांवर निर्घृणपणे गोळ्या चालवल्या. त्यात शंभरांवर साधू-संत, कारसेवक मारले गेले व अनेकांची प्रेते तर शरयू नदीत फेकण्यात आली. त्याच मुलायमसिंह यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. केवळ राजकीय दृष्टीकोनातूनच मुलायमसिंह यांना पद्म विभूषण पुरस्कारने गौरवण्यात आले. मात्र, असे करताना हिंदुत्ववादी भाजप सरकारला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर कसा काय पडला?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

    संजय राऊत म्हणाले, मुलायमसिंह हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे, पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळ्या चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंह यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? संजय राऊत म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.
    संजय राऊत म्हणाले, अयोध्येत आता राममंदिर उभे राहात आहे व त्याच राममंदिराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत मते मागितली गेली, पण 1990 साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायमसिंह यांनी असेही सांगितले की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूंना गोळ्या घालाव्या लागल्या असत्या तरी मागे-पुढे पाहिले नसते.’ मुलायमसिंह यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजप व त्यांच्या परिवाराने मुलायमसिंग यांच्यावर हिंदूंच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण त्याच मुलायमसिंह यांना आता मोदी सरकारने नागरी पुरस्कार दिला. मुलायमसिंह यांच्या नातेवाईकांनीही याबद्दल मागणी केली नव्हती. तरीदेखील सरकारने केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून हा पुरस्कार दिला, असे संजय राऊत म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी

    December 13, 2025

    माझ्यावर एवढं प्रेम का? अमिताभ बच्चन यांचा मनाला स्पर्श करणारा ब्लॉग

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.