अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात १९ वर्षीय विवाहितेचा चार जणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील महाविद्यालयाच्या गेटबाहेर जात असतांना १९ वर्षीय विवाहितेच्या मागे ४ तरुण पाठलाग करीत विवाहितेला चुकीचा शब्दाचा वापर करीत बोलविले तर त्यातील एकाने विवाहितेजवळ येत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तर तिघांनी त्या तरुणाला याकामी मदत करीत होते. यावेळी विवाहितेला वाचविण्यासाठी तिच्या पती जवळ आला असता त्यालाही लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना दि ३ रोजी दुपारी २ वाजेच्या…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चिखली, आरोपीच्या मुळगावी अमरावती येथे नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.2 मार्च) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी वामन सोनटक्के (वय-30 रा. मुपो. मार्डी, ता. तिक्सा, जि. अमरावती) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून अमरावती, चिखली, लोणावळा अशा विविध ठिकाणी नेऊन अत्याचार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तुम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी होण्याआधी तुमचा फोन फुल्ल चार्ज होणार अशी माहिती स्वत: कंपनीने दिली आहे. ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंच आहे. अवघ्या 9 मिनिटांत तुमचा फोन आता पूर्ण चार्ज होणार आहे. रिअलमेने स्पेनच्या बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला जीटी 3 फोन लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 9.5 मिनिटे लागतात. याची किंमत साधारण 649 डॉलर ( 53,543 रुपये) असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिअलमीने पहिल्यांदाच असा फोन लाँच केला आहे जो 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. या फोनसोबत 240W चा चार्जर देण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मेरठमध्ये पुन्हा एका सराफाचे दुकान लुटण्यासाठी चोरट्यांनी चक्क भुयार खणून शिरण्याचा प्रयत्न केला, परंतू यावेळी हे भूयार दुसऱ्याच दुकानात उघडले गेल्याने चोरट्यांचा हिरमोड झाला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी याच दुकानात अशाच प्रकारे यशस्वीपणे दरोडा टाकला होता. मेरठमध्ये चोरी करण्यासाठी भूयार खणण्याचा हा तिसरा प्रकार असल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील ज्वेलर्सनी आंदोलन करीत पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. मेरठमध्ये भुयार खणून त्याव्दारे ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न घडला आहे. परंतू हे भूयार दुसऱ्याच दुकानात उघडल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. विशेष म्हणजे चोरटे अशाच प्रकारे याच दुकानात 2022 मध्ये घुसून त्यांनी हे सोन्याचे दुकाने लुटले होते. मेरठ शहरात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्षभरापासून नियमित पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने महागाईमध्ये चांगलीच भर टाकली आहे. मध्यंतरी विविध राज्यांची सरकारं आणि केंद्र सरकारने टॅक्स कपात करून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र तेल कंपन्यांनी आजचे ३ मार्च रोजी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले असून आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातल्या चार महानगरांचा विचार…
पुणे : वृत्तसंस्था १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्षेत्र आणि सरकारे.. दोन्ही शिष्यवृत्तीच्या अनेक संधी देतात. परंतु अनेकदा माहितीच्या अभावामुळे बहुतांश विद्यार्थी या संधींना मुकतात. सरकारी शिष्यवृत्तीबद्दल बोलताना, साधारणपणे 11वीच्या प्रवेशासोबतच, राज्य शिष्यवृत्तीची प्रक्रिया समाज कल्याण विभागामार्फत करते. NTSE ही 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिशय लोकप्रिय शिष्यवृत्ती आहे. अशा अनेक संधी आहेत. त्यामुळे दहावीनंतर तुम्ही कोणत्या छात्रवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता ते जाणून घ्या. शिष्यवृत्तीचे अर्ज साधारणपणे 10वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होतात. येथे आम्ही तुमच्यासाठी मॅट्रिक/हायस्कूल (इयत्ता 10वी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही निवडक शिष्यवृत्तींची माहिती घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्ही सतर्क राहा आणि अशा संधींचा फायदा घेण्यात मागे राहू…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडची शान मानली जाणारा अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षा मात्र रामभरोसे पहायला मिळाली आहे. मुंबईतील वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. ही बाब त्याच्या सुरक्षेतील त्रुटीशी संबंधित आहे. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकत सुरतमध्ये राहणारे दोन तरुण मन्नतच्या भिंतीवरून उडी मारून आत घुसले. एवढेच नाही तर दोघेही बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यामुळे सुरक्षारक्षकांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी दोघांना पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे वय 21 ते 25 वर्षे आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगीशिवाय बंगल्यात प्रवेश करणे यासह भारतीय दंड संहितेच्या…
मुंबई : वृत्तसंस्था मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा हल्ला झाला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलेले हल्लेखोर चेहऱ्याला मास्क लावू आलेले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत पोलिस तपासातच अधिक माहिती समोर येईल. आज नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क येथे संदीप देशपांडे हे मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर तरुणीने चोपडा ग्रामीण पोलिसात धाव घेत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरुणी शेतमजुरी करून आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सखाराम बारेला हा तरुणीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवून तिला म्हणाला कि, मी तुला दीड लाख रुपये देतो तु माझी बायको होशील का ? असे विचारले असता तरुणीने त्याला सांगितले कि, मी तुझ्या मुलीच्या वयाची आहे असे बोलले असता संशयित आरोपी तरुणीस अश्लील भाषेत शिवीगाळ करीत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील ६३ वर्षीय वृद्ध मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील जगवानी नगरातील बबन नामदेव पवार (वय ६३) असे मृत वृध्दाचे नाव आहे. पवार हे बुधवारी सायंकाळी बाहेर पडल्यानंतर गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही सदस्यांना वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. सुरूवातीला अनोळखी म्हणून पथकातील राजेश सोनवणे, रवींद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणार्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे…

