मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो मधून अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहचला आहे. त्यामुळे तो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील असतो. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन्सच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर त्याचा खिडकीकडे पाहत असलेला फोटो शेअर करत लिहिले की, माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात आमोद्यातील दुचाकीस्वार ठार झाला तर तिघे जखमी झाले. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावातील डंपर चालक असलेला गणेश सपकाळे हा आसोदा येथील मालकाकडे मंगळवारी कामाला गेल्यानंतर रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (आमोदा खूर्द) याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे येत असताना कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत या कलमाखाली एक, सरकारी नोकरावर हल्ला या कलमाखाली एक आणि घरफोडीचे पाच असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहर, रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन अशा तिन पोलिस स्टेशनला मिळून त्याच्याविरुद्ध एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे व पो.नि. शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, इश्वर पाटील,…
औरंगाबाद : वृत्तसंस्था चोर हे कधीच ईच्छेने चोरी करत नाहीत त्यांच्यावर तशी वेळ येते म्हणून ते गुन्हे करतात. ठाणे शहरात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली ज्याने आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी चोऱ्या केल्या. ही घटना विष्णुनगरातील आहे. एक न्यूज एजन्सीनुसार, गेल्या आठवड्यात एक व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या घरातून लाखो रूपयांचे दागिने चोरी गेले. व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा त्यात चोर येताना दिसला. लवकरच चोराची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख वैभव मुरबदे म्हणून पटली. तो मुरबाडचा…
अमळनेर : प्रतिनिधी ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना करत असुन याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे. त्यासंबंधीचे निवेदन अमळनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना दिले असून आजपासून…
मुंबई : वृत्तसंस्था छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवने सुरू झाले असून 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती 2023 ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता. छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, छ. संभाजीनगर जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या…
मुंबई : वृत्तसंस्था एका तरुणासाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळच्या वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट बनल्यांचं चित्र सध्या दिसत आहे. शिवाजी पार्कात का बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमामध्ये दाखवतात, त्याप्रमाणे ‘एक फुल, दो माली’ अशा ही घटना आहे. यवतमाळच्या वणीमध्ये नगरपालिकेच्या शिवाजी पार्कमध्ये एका तरुणासाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काल (27 फेब्रुवारी)अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका महिला समाजसेविकाची केंद्र सरकारच्या तीस टक्के अनुदान योजनेतून गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून किरण मुरलीधर फेगडे आणि रोहन महेंद्र फेगडे (दोघे रा. मस्कावद ता. रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गोलाणी मार्केटच्या दुस-या मजल्यावर राहणा-या समाजसेविकेने याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला धाव घेत आपली हकीकत मांडली. या घटनेतील दोघांनी समाजसेविकेकडून ३ गरीब विद्यार्थ्यांच्या नावे लॅपटॉपच्या ७० टक्के रक्कम ९५ हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे. अद्याप लॅपटॉप मिळाले नाही अथवा दोघांनी पुर्ण रक्कम देखील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून जामनेर येथे जाणाऱ्या बसमध्ये महिला वाहकास एका तरुणाने अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याचा प्रकार काशीनाथ चौफुलीजवळ घडला. याबाबत वाहक महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव जामनेर एसटी बस ही सोमवारी सायंकाळी काशीनाथ चौफुलीजवळून जात होती. या बसमधील महिला वाहक ही तिकीट काढत होती. वाहक महिला एका तरुणाला “भाऊ तू तिकीट काढून घे’, असे म्हणाली. मात्र, त्या तरुणाने महिलेकडे पाहून अश्लील हातवारे केले. त्यानंतर मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. काही वेळानंतर वाहक महिलेने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून ४० हजार रुपये किंमतीचे पाच चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. कुणाल कुंदन पवार (वाघळी, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चाळीसगाव शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी संशयित येत असल्याची माहिती चाळीसगाव शहरचे निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर तयांनी कारवाईचे पथकाला आदेश दिले होते. संशयित आल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत 40 हजारांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड, महेंद्र पाटील, राहुल सोनवणे, निलेश पाटील, नरेंद्र चौधरी, विनोद खैरनार,…

