Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकाना चांगलाच हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले कि, मी साधा माणूस नाही. मी संजय राऊतांसारख्याला घाम फोडतो. त्यामुळं माझ्या नादी लागू नका, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे. मी बारक्यांच्या नादी लागत नाही असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं. माझ्या नादी…

Read More

बोदवड : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील ४३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ४३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास एक ३२ वर्षीय तरुण महिलेच्या घरात घुसत महिलेला झोपेतून उठवीत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी  विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सचिन चौधरी हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेले काकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या तरुणाच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 96 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी हनुमान नगरात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हनुमान नगरात विशाल गोपाल पाटील (वय-36) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून विमा प्रतिनिधी म्हणून नोकरी करुन ते कुटुबांचा उदनिर्वाह करतात. विशाल पाटील यांच्या काकाच्या मुलीचे लग्न असल्याने ते लग्न समारंभासाठी दि. 1 मार्च रोजी दुपारी चार वाजता धरणगाव तालुक्यातील कोठळ येथे गेले होते. त्यानंतर दि. 3 मार्च रोजी त्यांचे वडील…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था  धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. धुळ्यात शिरपूर तालुक्यात भोंगऱ्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सध्या या उत्सवामुळे शहरात मोठं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोकगीत, गायन, बासरी वादन आणि ढोलाच्या तालावर आदिवासी बांधव पारंपारिक कलाविष्कार सादर करत असून या बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होतेय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोडीद पनाखेड आणि दहिवद यांसह विविध भागांत होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजाराला उत्सवाला सुरुवात झाली असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून होत असते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून विविध गावातील आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था  राज्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा सामना करत परिक्षेला सामोरे जावे लागत असते. दरम्यान परिक्षा काळात घरातील कोणी व्यक्ती अचानक दगावल्यानंतर जे दु:ख येते त्याला सामोरे जात परिक्षा देणे खूप कठीण वेळ असते. परंतु सोलापूर जिल्ह्यात अशी एक घटना समोर आली आहे. अल्पशा आजाराने वडिलांचे सकाळी 8 वाजता निधन झालेले असताना मुलाने आपले दुःख बाजूला सारून आधी पेपर दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती येते घडली. वडिलांच्या निधनाचे दु:ख सहन करत बारावीचा पेपर दिल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास वडिलांच्या चितेला त्या मुलाने भडाग्नी दिला.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर झाले यंदा बारावी बोर्डाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बोर्डाने घेतला आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याची बातमी समोर आल्यानंतर बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. मात्र यावेळी पेपरमध्ये तीन चूका असल्याचे समोर आले होते. या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका आढळून आल्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांना मिळून…

Read More

धुळे : वृत्तसंस्था  राज्यातील गुन्हेगारी मोठ्या संख्येने होत आहे. अगदी शुल्लक कारणाने खून होत असल्याच्या घटना राज्यात नियमित घडत असतांना दिसून येत आहे. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. स्वतःच्याच मुलीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या बापाची पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याचा प्रकार धुळ्यात घडलाय. कोणताही सबळ पुरावा नसताना पोलिसांनी अचूक तपास करत आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी याप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीसोबत आणखी तिघांना अटक केली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. त्यामुळे या तरुणाचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले होते. आरोपींनी तरुणाच्या मृतदेहाजवळ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये, एक आरोपी हा शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असून काही दिवसांपूर्वीच त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टिकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिलीय. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून कुठल्याही प्रकारे हि गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेतच नाही. नर्मदेच्या कालव्याच्या नजीक घडली आहे. एकाच कुटुंबातील 7 जणांनी कालव्यात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. ही घटना राजस्थान येखील असून इथल्या एका कुटुंबियांतील पती पत्नीच्या वादामुळे घरातील सगळ्यांचेच प्राण गेले आहेत. एका कॉल रेकॉर्डनं हा घात केला असल्याचे समोर आले आहे. परंतु नक्की असं काय झालं ज्यामुळे ही घटना घडली? समोर आलेल्या माहितीनुसार, या केसमध्ये पत्नीचे घरापाशीच राहणाऱ्या दुसऱ्या एका इसमाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरूषाशी प्रेमसंबंध असल्याचे कळताच पतीनं याबद्दल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे मनसे नेते संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रोज त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच असल्याची संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप होते. त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. मात्र, हल्लेखोरांना संदीप देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. हा आरोपी ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. भांडुपच्या कोकण नगर भागातून कसली पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यापासून ठाकरे गटावर संशय…

Read More