• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गट अडचणीत ; आमदारासह ४० जणावर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 28, 2023
in क्राईम, राजकारण
0
शिंदे गट अडचणीत ; आमदारासह ४०  जणावर गुन्हा दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था 

हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे. यामुळे आता शिंदे गट चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हिंगोलीतील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह महिला कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डाॅ. अशोक उपाध्याय यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे 18 जानेवारी रोजी महाविद्यालयात गेले असता महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच मांडला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यास मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.

दरम्यान, या प्रकरणात आज पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत डॉ. अशोक उपाध्याय यांनी म्हटले आहे की, आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा 40 जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सीसीटीव्हीचे, डीव्हीआरचे वायर तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. प्रचार्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आमदार संतोष बांगर, शंकर बांगर, महाविद्यालयातील अधिव्याख्याता यांच्यासह 40 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मगन पवार पुढील तपास करीत आहेत. आमदार संतोष बांगर यांनी 18 जानेवारी रोजी दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण झाली होती. मात्र, या घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. त्यामुळे 10 दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

Previous Post

गुन्हेगारावर बसणार वचक : ५ टोळीला लावला मोक्का !

Next Post

पत्नीला घटस्फोट देत तिच्याच मैत्रिणीला केली लग्नाची मागणी !

Next Post
जळगावात भरलग्नाच्या स्टेजवरून सोन्याचे दागिने लंपास !

पत्नीला घटस्फोट देत तिच्याच मैत्रिणीला केली लग्नाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group