Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुळ्यात पतीने भरदिवसा संपविले पत्नीला !
    क्राईम

    धुळ्यात पतीने भरदिवसा संपविले पत्नीला !

    editor deskBy editor deskJanuary 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : वृत्तसंस्था 

    कौटुंबिक वादातून महिलेची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला देखील अटक केली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर या ठिकाणी हि घटना घडली आहे. दिपालीचा पती नागेश दगडू कानडे यानेच भरदिवसा आपल्या पत्नीवर धारदार हत्याराने वार करून तिला जखमी केले. यानंतर दीपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    २८ रोजी  दुपारी साक्री रोड परिसरात असलेल्या यशवंत नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून नागेश कानडे याने धारदार शस्त्राने पत्नी दिपालीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. जखमी दीपालीला तातडीने उपचारांसाठी दिर गणेश दगडू कानडे यांनी हिरे वैद्यकीय शासकीय जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी आरोपी पती नागेश कानडेला अटक केली. नागेश दगडू कानडे आणि दिपालीचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. मागच्या काही महिन्यांपासून नागेश कानडे याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.