नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चाललेली असतांना एक धक्कादायक घटना विलासपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी बनावट नोटांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी एका तरुणाच्या घरी छापेमारी केली. तिथे त्यांना बनावट नोटा छापणाऱ्या नोटांसह एका महिलेचे 6 तुकडे करण्यात आलेला मृतदेह आढळला. ही डेडबॉडी पाण्याच्या टाकीत ठेवण्यात आली होती. आरोपीने सांगितले, त्याने 2 महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर तिचे तुकडे करून ते टाकीत लपवले होते. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचा दावा आरोपीने केला. पोलिस आरोपीच्या घरी धाड टाकण्यासाठी पोहोचले तेव्हा तिथे सर्वत्र दुर्गंध पसरल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी सिटेंक्सच्या टाकीचे झाकण उघडले असता त्यांचे डोळेच पांढरे झाले. टाकीत महिलेचे तुकडे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती स्वत: बीग बींनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. टीन या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ यांना अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. काळजीची बाब नाही. वेदना होत आहे, पण दुखापत झालेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बर्फ लावत असून पेनकिलरही घेतली आहे. 48 तासांत बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले. टीन एक थ्रिलर चित्रपट असून अमिताभ मागील अनेक दिवसांपासून कोलकातामध्ये शूटिंग करत आहेत. या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वाची भूमिका…
सावदा : प्रतिनिधी रावेर, चोपडा व जामनेर तालुक्यातील विविध गावातून डझनभर दुचाकी चोरणाऱ्या दोन भामट्याना दुचाकीसह पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. बर्हाणपूर तालुक्यातील पातोंडा येथील जावेद मुबारक तडवी व यावल तालुक्यातील कोळवद येथील मुनाफ मुबारक तडवी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सावद्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, मोहसीन खान पठाण, यशवंत टहाकळे, विनोद तडवी, मनोज तडवी, नामदेव कापडे यांनी नाकाबंदीदरम्यान संशयित जावेद मुबारक तडवी (पातोंडा) याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडल्यानंतर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली तसेच यााबाबत सावदा पोलिसात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेमाला मर्यादा किंवा बंधन नसतं. यामुळेच ‘प्रेम आंधळं असतं’ असं लोक म्हणतात पण प्रेमात तुम्ही किती मर्यादा ओलंडता, हेदेखील महत्त्वाचं ठरतं. प्रेमाचे काही नियम आहेत का? आम्ही तुम्हाला एका घटनेबद्दल सांगतो, जिच्याबद्दल ऐकून तुम्ही हैराण व्हाल. राजस्थानमध्ये एका व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. तो व्यक्ती आपल्या मुलाच्या पत्नीसह पळून गेला.जेव्हा लोकांना हे समजलं तेव्हा सगळेच शॉक झाले. इतकंच नाही तर सुनेला सहा महिन्यांची एक मुलगीही होती, जिला ते घरीच सोडून गेले. महिलेच्या पतीने आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. ज्यात एक व्यक्ती आपल्या सुनेच्या प्रेमात पडला आणि तो…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यात एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्या १५ दिवसापासून या अल्पवयीन मुलगी कपडे सुकविण्यासाठी गच्च्चीवर जात असतांना संशयित आरोपी नेहमी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असतो तर दि.५ रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेल्याने अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये जाण्यासाठी मोबाईलच्या प्रकाशझोतात जावून आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी संशयित आरोपी याने तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी प्रदीप उर्फ गोलू कालिदास महाजन (२५) याच्या विरोधात रावेर पोलिसात…
जळगाव : प्रतिनिधी शिरसोलीदरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने वरखेडी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इजास रसूल काकर (वय २७, रा. वरखेडी ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. इजास रसूल काकर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. भांडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी सुरत जाण्यासाठी इजास हा पाचोरा येथून जळगावला येण्यासाठी मेमू ट्रेनने बसला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली ते जळगाव रेल्वे रूळ दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जळगाव रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्याजवळील मोबाईलच्या…
मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्तीला काही तरी व्यसन जडलेले असते. पण कुठलेही व्यसन चांगले नसते हे माहित असतांना हि अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेलं असतात. अशीच एक धककादायक घटना गुजरातमधील राजकोटमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने धुम्रपान केल्यानंतर आपला आवाज गमावला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गायी चारण्यासाठी आलेल्या या व्यक्तीला अज्ञात लोकांनी ही सिगारेट दिली होती. एका वृत्तानुसार पीडित व्यक्तीवर गुजरातमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सिगारेट प्यायल्यानंतर तरुणाची वाचा गेल्याच्या वृत्ताने स्थानिक लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. धुम्रपान करण्याचे दुष्परिणामांवर (Side effects of smoking) मागील बऱ्याच कालावधीपासून संशोधन सुरु आहे. धुम्रपान केल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होतात…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांनी अटक केली आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सल्तनत मध्येच झाला. फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये विभाजन घालायचे ते विरोधात बोलत असावेत. जात, धर्म राजकारण झालं की प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील जनावरांच्या बाजारात विक्री करताना दोन महिलांना चोरलेल्या बकऱ्या मालकांनी व्हिडीओ कॉलींगद्वारे ओळखले आहे. जळगाव एमआयडीसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यात जनावरे, कोंबड्याही खेड्यांवरून विक्रीला येतात. शनिवारी दोन महिला बकऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. पोलिस नाईक अल्ताफ पठाण, विशाल कोळी यांना चोरीच्या बकऱ्या विक्रीला आल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांनी बाजारात जाऊन खात्री केली असता, त्यांना बकऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांवर संशय आला. डशा पांडुरंग काटे (वय ५०) व सपना रवीद्र गोंधळी (३२) या दोघी महिलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, तेथे बकऱ्या चोरीचा…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात बारावीची परीक्षा सुरु असतानाच एक मोठी घटना घडली होती. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पेपर फुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाही. राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने पेपर फुटीच्या मुद्दावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला धारेवर धरलं.…

